शहरात वाहतुकीचा खोळंबा, विभागाने मिटले डोळे

- दारव्हा मार्गावर खाजगी वाहनांचा ठिय्या

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
शहरातील बेलगाम वाहतुकीवर (Traffic jam) नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिस वाहतूक विभागाचे आहे. मात्र, त्यांनी डोळे मिटल्याने शहरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. आता याकडे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी लक्ष देऊन कडक आणि स्थायी स्वरूपाची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
 
Traffic jam
 
स्थानिक दत्त चौक, दारव्हा मार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा (Traffic jam) नियमितपणे होतो. त्यातही दारव्हा मार्गावर खाजगी वाहनचालक, प्रामुख्याने बसेस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. परिणामी वाहतुकीला अडचण निर्माण होते. याकडे अनेक वेळा नागरिकांनी वाहतूक विभागाकडे तक्रारसुद्धा केली आहे. मात्र, पोलिस वाहतूक विभागाकडून या वाहनचालकांकडे सपशेल दुर्लक्ष करून त्यांना रस्त्यावर वाहन उभे करण्याची ‘अर्थपूर्ण’ मूकसंमती देण्यात येत आहे. आता याकडे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी लक्ष देऊन योग्य उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
म्हणे आरटीओ करणार कारवाई
याबाबत काही नागरिकांनी वाहतूक विभागाकडे तोंडी तक्रार केली असता यावर आता आरटीओ कार्यालय कारवाई करणार असल्याचे सांगून पोलिस वाहतूक विभागाने सपशेल हात वर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतुक विभागाचे आहे.