महिलांच्या सुप्त गुण विकासाकरिता आनंद मेळावा

- आमदार मदन येरावार यांचे प्रतिपादन

    दिनांक :25-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
कोरोना काळात टाळेबंदी असल्यामुळे महिलांना त्यांच्या सुप्त गुणांचा (latent qualities) विकास करण्याची भरपूर संधी मिळाली. त्यात त्यांच्या हातून अनेक प्रकारचे नवनवीन व्यंजने तयार झालीत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांच्या या सुप्त गुणांचे रूपांतर अर्थाजनात व्हावे, यासाठी व्यासपीठाची आवश्यकता आहे. या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून 22 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रादेशिक व्यंजनांचे स्टॉल्स लावलेले होते. यातून निश्चितच महिलांना अर्थाजनाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. असे आनंद मेळावे सतत आयोजित करावे, असे प्रतिपादन आमदार मदन येरावार यांनी केले.
 
latent qualities
 
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या आनंद मेळावा उद्घाटन प्रसंगी आ. येरावार बोलत होते. भावे मंगल कार्यालय येथे झालेल्या या मेळाव्यात भाग घेणार्‍या सर्व स्टॉल धारकांची त्यांच्या खाद्य पदार्थांची संपूर्ण विक्री झाली म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या संयोजक वैशाली खोंड, उषा खटे, प्राजक्ता टिकले होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ शहर भाजपातर्फे सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महिला आघाडीच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध प्रादेशिक व्यंजनांचे 22 स्टॉल्स लावण्यात आले.
 
 
या प्रसंगी प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, शहराध्यक्ष प्रशांत यादव, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष रेखा कोठेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माया शेरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजू पडगिलवार व दत्ता राहणे, सेवा पंधरवाडा संयोजक आध्यात्मिक आघाडीचे शंतनू शेटे, बाळासाहेब शिंदे, डॉ. दीपक शिरभाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी महिला आघाडीच्या मीनल पांडे, भारती जाठे, रेखा नंदुरकर, सुनीता मडावी, जिल्हा व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते, युवामोर्चा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.