जिल्हास्तरीय रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी

    दिनांक :25-Sep-2022
|
मेहकर, 
बुलडाणा जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशनchampionship  च्या सहकार्याने व महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोशिएशनच्या अधिपत्याखाली टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया च्या नियमानुसार 23 वी सिनिअर टग ऑफ वॉर (रस्सीखेच) राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सेन्ट्रल पब्लीक स्कुल मेहकर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन ची जिल्हास्तरीय स्पर्धा व निवड चाचणी श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविदयालय मेहकर ता मेहकर जि बुलडाणा येथे 23 रोजी आयोजित करण्यात आली होती. बुलडाणा जिल्हातुन 150 पुरुष व महिला खेळाडुनी सहभाग घेतला होता.
 

ytu 
 
स्पर्धेचे उदघाटन धर्मवीर दिलीपराव रहाटे शिक्षण championship बहुउद्देशीय संस्थेचे सचिव ऋषी जाधव यांचे हस्ते झाले. या प्रसंगी बुलडाणा जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडु तथा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त श्रीराम निळे, डॉ बालाजी लाहोरकर प्राचार्य सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविदयालय मेहकर, डॉ. गजानन निकस प्राचार्य, सेन्ट्रल पब्लीक स्कुल मेहकर,प्राचार्य प्रताप बोरकर, प्राचार्य सरीता खंडेलवाल, प्रा. संगीता खडसे, प्रा. डॉ संतोष कुटे, प्रताप पाटील, प्रा. डॉ पवार दिगांबर, प्रा.डॉ मोहीते युवराज याच्यासह संस्थेच्या सर्व विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. बालाजी लाहोरकर यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध संधीचा उपयोग करून या खेळामध्ये प्राविण्य मिळविण्याचे आवाहन केले तर श्रीराम निळे यांनी खेळाडुंना या खेळाचा इतिहास विशद केला. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संगीता खडसे यांनी प्रयत्न केले.