जमिनीचे पट्टे व घरकुलासाठी शेकडो महिलांचा मोर्चा

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
पांढरकवडा, 
Agitation of Women's : येथील आंबेडकर वॉर्ड बौद्ध विहारासमोर शेकडो दलित, मादगी मुस्लिम व मसानजोगी महिलांनी शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला. या महिलांनी आपल्या मागण्या तत्काळ पूर्ण करा, अशी मागणी करून नंतर उपजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला.
 
Agitation of Women's
 
यावेळी पांढरकवड्यातील राजकीय, सामाजिक व प्रत्येक ठिकाणी साचलेली घाण दूर करणे, शहरातील गुंडाराज, भूमाफिया, खंडणीबाज, तसेच आंबेडकर वस्तीसह सर्व प्रलंबित घरांचे पट्टे देणे, निराधार मदत व अन्नसुरक्षा मिळणे, नगर परिषदेत पाच वर्षांत आलेला निधी व केलेला खर्च यांचे स्वतंत्र ऑडिट व चौकशी करा, तसेच पोलिस बंदोबस्तात सुरू असलेला वरळी मटका व कि‘केटचा मटका बंद या मागण्यांचे निवेदन (Agitation of Women's) दिले. यावेळी आदिवासी नेते अंकित नैताम, नगरसेवक बंटी जुवारे, परवेज खान, मनोज देशमुख, बाबू जैनेकर, निलेश जयस्वाल, अशोक वाघाडे, सूरज जयस्वाल, सतीश सुबुगडे, सागर कांबळे, नकुल जेनेकर, सउद, शब्बीर फ‘ुटवाले, संतोष पवार, ओम ढाकणे, संतोष चामलवार, गणेश कोल्हे सहभागी होते.
 
 
मागील 30 वर्षांपासून जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न प्रलंबित आहे. यावेळी बोलताना माजी नगरसेवक वसंत रामटेके म्हणाले, आंबेडकर वस्तीत सरकारी जागेवर मागील 60 वर्षांपासून नझूल जागेवर दलित व मादगी समाजाचे शेकडो कुटुंब राहत आहेत. संपूर्ण चौकशी करून, कायदेशीर बाजू तपासल्यानंतर तसेच नगर परिषदेने जमिनीचे पट्टेे व घरकुल देण्याचा प्रस्ताव दिल्यानंतरही पैसे देत नसल्यामुळे हे गरीब हक्काच्या घरकुलापासून वंचित आहेत. आम्ही मागील 20 वर्षांपासून प्रशासनाचा दारावर चपला घासत आहोत, मात्र आमचे काम करण्यास कोणीही तयार नाही. आता तर आम्हाला भर पावसात रस्त्यावर उपोषण (Agitation of Women's) करावे लागत आहे. आतातरी अधिकार्‍यांनी जागावे, अशी विनंती प्रकाश रामटेके, भाऊराव मेश्राम, मीरा खोब‘ागडे, सुभद्रा काळे, मंगला खोंडे, जगदीश प्रजापती, दत्ता उकंडे, चिनय्या अवणुरवार, संतोष रामटेके, पवन मेश्राम यांनी यावेळी केली.
 
 
सरकारने घरकुल व जमिनीचे पट्टे दिले नाही तर 3 ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विशाल मेश्राम, सुधाकर जंगलवार, माया मेश्राम, रमेश आत्राम, रेशमा गेडाम, देवनाथ गेडाम, काशिनाथ उपरे, व्यंकटी सातुरवार, मलय्या अवणुरवार, नरसिंग कुटलवार, अशोक गुम्मडवार, रवी कनकुंटलावार, नरसिंग कुरेवार, राजन्ना बतलवार, हनमंतू अडूरवार, देवाजी रामटेके, समाधान रामटेके, रवी रामटेके, वसंत रामटेके, संतोष गेडाम, दशरथ मेश्राम, महेश गेडाम, नंदकुमार वड्डे या वंचित दलित व मादगी समाजाच्या नागरिकांनी यावेळी दिला.