अंबा व एकविरा देवी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

- सर्वत्र चैतन्यमय वातावरण

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबा व एकविरा देवी (Ekvira Devi) नवरात्रोत्सवाला सोमवार 26 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. भक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती.
  
Ekvira Devi
 
श्री अंबादेवी मंदिरात सोमवार, 26 सप्टेंबरला पहाटे 5 वाजता सचिव अ‍ॅड. दि. मा. श्रीमाळी यांच्या हस्ते अंबादेवीला अभिषेक करून घटस्थापना झाली. सकाळी 7.30 वाजता सचिव रवींद्र कर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. श्री एकविरा देवी मंदिरात सकाळी 7.30 वाजता घटस्थापना होणार झाली. सकाळी 10 वाजता ध्वजारोहण झाले. दोन्ही मंदिरात महिला व पुरूषांची वेगवेगळी प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे. ओटी भरणार्‍या महिलांसाठीही वेगळी व्यवस्था आहे. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बहुतांश ठिकाणी लावण्यात आले आहे. मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी भाविकांची दर्शनासाठी दोन्ही मंदिरात मोठी गर्दी होती.
 
 
जिल्ह्यात नवरात्रोत्सव उत्साहात सुरू
भातकुली तालुक्यातल्या गणोजा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात, मोर्शी तालुक्यातल्या श्री पिंगळादेवी गडावर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातल्या मुर्‍हादेवी मंदिरासह अन्य मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. तसेच सार्वजनीक मंडळांच्या श्री दुर्गा देवी उत्सवालाही प्रारंभ झाला. भव्य मिरवणूकाही निघाल्या. सोमवारी सर्वत्र उत्साहाचे व मंगलमय वातावरण होते. जिल्ह्यातही पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. संवेदनशिल भागात विशेष लक्ष देण्यात येत आहे.