नक्षलसमर्थक साईबाबाच्या प्रकरणावर युक्तीवाद पूर्ण

- उच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान

    दिनांक :26-Sep-2022
|
नागपूर, 
बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरविण्यात आलेला नक्षल समर्थक (Pro-Naxalite) प्रा. जी. एन. साईबाबा व त्याच्या सहकार्‍यांनी सत्र न्यायालयाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याप्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला असून यावर पुढील सुनावणी गुरूवारी ठेवण्यात आली आहे.
 
Pro-Naxalite
 
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून (Pro-Naxalite) प्रा. साईबाबाला गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावणी आली आहे. त्याने सत्र न्यायालयाच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्या. रोहित देव व न्या. अनिल पानसरे यांच्यासमक्ष गेल्या दोन आठवड्यापासून सुनावणी सुरू आहे. पोलिस तपासात अनेक चुका असून त्यांद्वारे असे लक्षात येते की, साईबाबाला अवैधरीत्या अटक करण्यात आली आहे आणि त्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा युक्तीवाद बचावपक्षातर्फे करण्यात आला.
 
 
तर सरकारी पक्षाच्या युक्तीवादानुसार, सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे सबळ असून गुन्हेगारांची शिक्षा कायम ठेवण्यात यावी. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून वरिष्ठ अधिवक्ता सिद्धांत दवे यांनी बाजू मांडली. बचावपक्षाकडून वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. प्रदीप मानध्यान यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. निहालसिंह राठोड आणि ड. बिपीन कुमार यांनी सहकार्य केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणे अपेक्षित आहे. दोन्ही पक्षांना एखादा नवा मुद्दा मांडायचा असल्यास त्यांना तो मांडता यावा, यासाठी गुरुवारची सुनावणी ठेवण्यात आली आहे.