भाजपा च्या वतीने पुणे येथील घटनेचा निषेध

पीएफआय संघटनेवर कायम बंदी घाला

    दिनांक :26-Sep-2022
|
वाशीम, 
पॉप्युलर फंड ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्यांनी BJP protest पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले. तसेच अनेक देशविरोधी कारवायामध्ये ही संघटना सक्रिय असून, या संघटनेवर कायमची बंदी आणावी आणि पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देणार्‍या गद्दारांना कठोर शिक्षा करण्यात व्हावी, याकरीता भाजपा नेते राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.
 

hg 
 
 
यावेळी पीएफआय संघटनेच्या च्या विरोधात BJP protest प्रचंड घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला. पीएफआय संघटनेच्या आड देशविघातक कृत्य करण्याचे काम केल्या जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या संघटनेच्या विविध कार्यालयावर कारवाई करुन अनेक पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुणे येथे या संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांनी पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देवून देशविरोधी कृत्य केले. त्यामुळे या घटनेचा भाजपा च्या वतीने तीव्र निषेध करुन या संघटनेवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली. यावेळी भाजपा नेते राजू पाटील राजे, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, नगरसेवक राहुल तुपसांडे, भीमसेठ जीवनाणी, अमीत मानकर, गौतम सोनवणे, अनिल ताजने, गणेश खंडाळकर, सुनील तापडिया, रामेश्वर ठेंगडे, आशुतोष निरखी, आनंद गडेकर, राजू काळे, बजरंग आळणे, सुभाष नंदापूरे, शुभम आढाव, इंदीरा बरेटी, वैशाली जोशी यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.