श्री बालाजी संस्थान मध्ये वार्षिकोत्सवाचे आयोजन

१५ दिवस सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे भरगच्च कार्यक्रम

    दिनांक :26-Sep-2022
|
वाशीम,
वाशीम शहराचे आराध्य दैवत भक्तांचे श्रध्दास्थान श्री बालाजी संस्थान Balaji Sansthan येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीजींचा वार्षिकोत्सवाचे आयोजन २७ सप्टेंबर ते १० ऑटोबर पर्यंत करण्यात आले असून, यादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे वहिवाटदार विश्वस्त अ‍ॅड. भवानीपंत ज्ञानेश्वर काळू यांनी केले आहे.
 
 gh

 
दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री बालाजी यांचा Balaji Sansthan वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, त्यानिमीत्त २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता चित्रा नक्षत्रावर श्रीलक्ष्मी व्यंकटेशाचे नवरात्र प्रारंभानिमीत्य ध्वजारोहण, २८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता वंदना विवेक देवधर रा. नागपूर यांचे गायन, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजता श्री बालाजी महिला भजनी मंडळ वाशीम यांचे भजन, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजता गायत्री महिला भजनी मंडळ वाशीम यांचे भजन, १ ऑटोबर रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजता नागोराव विठोबा भडदमकर रा. वाशीम यांचे प्रवचन, २ ऑटोबर रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजता राजेश्वर बबनराव लव्हाळे वाशीम यांचे प्रवचन, ३ ऑटोबर रोजी श्री चामुंडा देवीस परकर व पुजा, ४ ऑटोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता रथोत्सव, ५ ऑटोबर रोजी दुपारी ४.३० वाजता विजया दशमी निमीत्य श्री ंच्या प्रतिमेची पालखीतुन मिरवणूक, ६ ऑटोबर रोजी रात्री ८.३० वाजता राजेंद्र दिक्षीत रा. पूणे यांचे गायन, ७ ऑटोबर रोजी महापुजा व महाप्रसाद, ८ ऑटोबर रोजी सायंकाळी सर्वेश श्रीकृष्ण रा. हिंगोली यांचे किर्तन, १० ऑटोबर रोजी दुपारी ४ वाजता डॉ. शरद यशवंतराव आंबेकर यांचे गोपालकाल्याचे किर्तन, सायंकाळी ५.४५ वाजता गोपालकाला व दही हंडी कार्यक्रम होणार असून, या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड. भवानीपंत काळू यांनी केले आहे.