धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

- अलौकिक शक्तीद्वारे चमत्कार करून आजार बरे करण्याचा दावा

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
उमरखेड, 
Religious Sentiments : उमरखेड शहरासह ग‘ामीण भागात मागील काही दिवसांपासून ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्याकडील अलौकिक शक्तीद्वारे चमत्कार करून आजार बरे करण्याचे बनावट प्रकार घडत होते. भगतसिंग वार्डात वास्तव्यास असणार्‍या एकास पोलिसांनी अटक केल्याची घटना रविवार, 24 सप्टेंबर रोजी एका तक‘ारीवरून घडली.
 
Religious Sentiments
 
शहरातील भगतसिंग वार्डात दत्ता परसराम लांबटिळे (28, साठेनगर, गिरगाव ता. वसमत, जि. नांदेड) हा मागील अनेक दिवसांपासून ख्रिश्चन धर्माचे काम करीत असून भोळ्याभाबड्या व गरीब जनतेला फसवत ख्रिश्चन धर्मप्रसार करीत असल्याची माहिती देवानंद इंगोले यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी त्यांच्या मित्र अतुल खंदारे यांना रुग्ण म्हणून दत्ता लांबटिळे याच्याकडे नेेले. या ठिकाणी आरोपी हा 50 ते 100 महिला व पुरुषांच्या उपस्थितीत लोकांच्या डोक्यावर आळीपाळीने हात ठेवून त्यांना तेलाप्रमाणे द्रवपदार्थ हातावर देऊन वास घेण्यास सांगत होता, असे आढळून आले.
 
 
देवानंद इंगोले लांबटिळे याच्याकडे गेले असता त्याने आजाराबाबत विचारणा करून त्यांच्या हाताला तेल लावून त्याचा वास घेण्यास सांगितले. वास घेतला असता देवानंद यांना काही वेळाकरिता काहीही भान राहिले नाही. त्यानंतर देवानंद यांना, तू आता बरा झाला असून तुला आता कोणत्याही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नसल्याचे लांबटिळेने सांगितले. त्यावेळी देवानंद इंगोले यांनी, काहीही झाले नाही, चमत्कार अलौकिक शक्तीवगैरे काही नसल्याचे म्हटले. त्यावेळी दत्ता लांबटिळे याने देवानंद यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. यावेळी माझ्या देवीदेवतांबद्दल वाईट बोलून दत्ता याने आपल्या धार्मिक भावना (Religious Sentiments) दुखावल्याची तक‘ार देवानंद इंगोले यांनी पोलिस ठाण्यात केली. आरोपी दत्ता लांबटिळे याच्याविरोधात उमरखेड पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले असून अधिक तपास ठाणेदार अमोल माळवे करीत आहेत.

धर्माची बदनामी करणार्‍यास ठेचून काढू
- आमदार नामदेव ससाने यांनी बजावले
तालुक्यात ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरीब, भोळ्याभाबड्या हिंदू धर्मातील जनतेला नाना प्रकारचे आमिष दाखवून धर्मपरिवर्तन करण्याचा प्रकार होत असल्याची माहिती मिळताच आमदार नामदेव ससाने यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. अशा प्रकारचा धर्माविरुद्ध अपप्रचार किंवा बदनामी करणार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अशा प्रकारचे धर्मविरोधी काम करणार्‍यांना ठेचून काढू असा इशारा देऊन त्यांनी अशांबाबत सतर्क राहून कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.