बसपाचा चेतन पवार यांचा राजीनामा

- प्रदेश उपाध्यक्षपद सोडले

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
येथील मनपातील बहुजन समाज पार्टीचे (BSP) गट नेते, माजी उपमहापौर व स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले नगरसेवक चेतन पवार यांनी25 सप्टेंबर रोजी बसपाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वमर्जीने बसपा प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.संदीप ताजने यांच्याकडे सुपूर्द केला. सदर पदाच्या जबाबदारीमधून मुक्त करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या पत्राची प्रत त्यांनी प्रदेश प्रभारी अ‍ॅड. सुनील डोंगरे यांना दिली आहे.
 
BSP
 
चेतन पवार यांच्या राजीनाम्यामुळे अमरावती शहरातील राजकीय क्षेत्रात विविध चर्चा रंगल्या असून आता सत्ता समीकरण बदलणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठेने प्रामाणिक कार्य केल्यानंतर पाच वर्षापूर्वी त्यांनी बसपामध्ये प्रवेश करून मनपात सत्ता स्थापन केली होती. येत्या दोन दिवसात ते पुढील भूमिका जाहीर करतील, अशी माहिती चेतन पवार मित्र मंडळाचे समन्व्यक अ‍ॅड. प्रभाकर वानखडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
 
BSP