दापुरा प्राथमिक शाळेला मिळाले वाढीव शिक्षक

    दिनांक :26-Sep-2022
|
मानोरा, 
तालुयातील Dapura School  प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिस्थितीकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करीत असलेले विद्यमान लोकप्रतिनिधींना बहुदा विसर पडलेला असल्यामुळे आपल्या गावातील वाढलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिकविण्यासाठी शिक्षक मिळणेसाठी स्थानिक पातळीवरील शिक्षण समिती पदाधिकारी आक्रमक होत असल्याचे दापुरा येथील अपुर्‍या शिक्षकाच्या संख्येवरून पुढे येत आहे.
 
 
hfg
 
 दापुरा येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरीत अDapura School  सून तब्बल १२० संख्या असलेल्या या शाळेत केवळ चार शिक्षके सेवा देत आहेत. ह्या चार पैकी एक शिक्षक मुख्याध्यापक आणि दुसरे बीएलओ असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळू राठोड यांनी विद्यार्थ्यांसाठी तातडीने वाढीव शिक्षक मिळण्याचे निवेदन पंचायत समिती आणि वरिष्ठांना दिले होते. दापुरा शाळा व्यवस्थापन समितीने एक आठवड्यापूर्वी दिलेल्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वाढीव शिक्षक न मिळाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बाळू राठोड यांच्या निवेदनाची दखल घेऊन दापूर येथील प्राथमिक शाळेवर एक वाडी शिक्षक देण्याचे पत्र राठोड यांना नुकतेच मिळाल्यामुळे ताला ठोको आंदोलन न करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती दापुरा यांनी केला आहे. वाढीव शिक्षक मिळण्यासाठी दैनिक तरुण भारत ने वृत्तपत्रात बातमी देऊन पाठपुरावा केला होता.