‘नवोदयन ऑफ द इयर-महाराष्ट्र’

सुधीर गोहणे पहिले मानकरी

    दिनांक :26-Sep-2022
|
गडचिरोली,
शिक्षण  क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली येथील जवाहरलाल नेहरू उच्च  Education प्राथमिक डिजिटल शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांना ‘नवोदयन ऑफ द इयरट पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. ते या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत.
 
dsdgdfgffghg
 
शिक्षण क्षेत्रातील (Education) अतुलनीय कामगिरीकरीता गडचिरोलीचे सुधीर गोहणे यांना यावर्षीचा ‘नवोदयन आँफ द इयर’ हा पुरस्कार पत्रकार भवण, पुणे येथे 89 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, नवोदय विद्यालय समिती पुणेचे आयुक्त बी. वेंकटेश्‍वरण यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रात 34 नवोदय विद्यालय आहेत. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या हेतूने नवोदय विद्यालयाची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली. यामधून आजतागायत लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेत. यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घ्यावे यासाठी नवसंवाद प्रकाशन व संपूर्ण भारतभरातील नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने वैद्यकीय, सामाजिक, कला व संस्कृती, शिक्षण या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणार्‍या नवोदयन्सना सन्मानित करण्यासाठी 2022 मध्ये ‘सुपर अवार्ड्स’ ‘नवोदयन आँफ द इयर’ सुरू करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीकरीता गडचिरोलीचे सुधीर गोहणे यांना यावर्षीचा ‘नवोदयन आँफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.