गरबा आयोजनस्थळी अहिंदूंना प्रवेश नको

- विश्व हिंदू परिषदेची आयोजकांना विनंती
- दांडिया नृत्य देवीच्या आराधनेची पद्धती

    दिनांक :26-Sep-2022
|
नागपूर, 
नवरात्रोत्सवात संपूर्ण विदर्भात अनेक Garba venue सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांसह खाजगी संस्था, व्यक्तींमार्फत गरबा नृत्य तसेच दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात महिला आणि युवती मोठ्या सं‘येने सहभागी होतात. तसेच अनेक परिवार मोठ्या सं‘येने हे उत्सव बघण्यासाठी उपस्थित असतात. या आयोजनामध्ये केवळ हिंदू धर्मीय लोकांनाच प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केली. गरबा व दांडिया उत्सव ही आपल्या संस्कृतीतील देवीच्या उपासनेची पद्धत आहे. हे केवळ मनोरंजन किंवा नृत्याचे आयोजन नसून, धार्मिक आस्थेचे प्रतीक आहे. म्हणून या आयोजनामध्ये अन्य धर्मीय लोकांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
 
 
jghjg
 
गरबा आणि दांडिया उत्सव आयोजकांनी Garba venue आधार कार्ड बघून भाविकांना प्रवेश देण्याची व्यवस्था करावी, तसेच गरबा स्थानी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. संमाजकंट अशा सार्वजनिक धार्मिक आयोजनाचा गैरफायदा घेतात. त्यामुळे पोलिस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी आणि तसे निर्देश द्यावेत, असे विहिंपने येते जारी केलेल्या एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
लव्ह जिहाद व धर्मांतरणच्या घटनांमध्ये झालेली वाढ, ही सध्या चिंतेचा विषय असून, त्याबाबतीत या आयोजनावर स्थानिक बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची नजर असणार आहे. परंतु आयोजकांनीही आपल्या परीने जनजागृती करावी, असे आवाहन विहिंपचे विदर्भ संघटन मंत्री गोविंद शेंडे यांनी केले आहे.