मनोकामना पूर्ण करणारी आई जगदंबा

- आसेगाव देवीचा नवरात्रोत्सव सुरू

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
आसेगाव देवी येथील हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. नवरात्रात आई जगदंबेच्या (Jagdamba) दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते. त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार्‍या आई जगदंबेविषयी आ‘यायिका सांगितली जाते. 1670 मध्ये आसेगावला मराजी नावाचे धार्मिक वृत्तीचे गृहस्थ होते. ते दिवसभर गावामध्ये गाई राखून त्यानंतर गोठ्याची साफसफाई करत होते. जणू त्यांनी गावाला स्वच्छतेचा मंत्र दिला होता. गाईचे धन गावांमध्ये जास्तीत जास्त वाढावे, गाव समृद्ध व्हावे यासाठी ते रात्रंदिवस झटत असत. त्यांची गोमातेची सेवा पाहून एके दिवशी जगदंबा मातेने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. आसेगाव येथील भगवान मुंगसाजी महाराजांचे परमशिष्य संत घोगले बाबांनी त्यांच्या काव्यसंग‘हात संत मराजी महाराजांविषयी लिहिले आहे.
 
Jagdamba
 
एके दिवशी मराजी गाई घराकडे वळवत होते त्याचवेळी प्रत्यक्ष आई जगदंबा (Jagdamba) त्यांच्यासमोर उभी राहिली. तू मला सोबत घरी घेऊन चल. तिथेच तुझ्याकडून कल्याणकारी कार्य घडावे म्हणून मी स्थिरावेल. परंतु तू समोर चालत असताना मागे वळून पाहू नकोस. चालताचालता गाव जवळ आले. मराजींनी मागे वळून पाहिले, तो काय आई जगदंबा गुप्त झाली. त्याच ठिकाणी मराजींनी आई जगदंबेची स्थापना केली. त्याकाळी मातीचा परकोट बांधून मंदिराची निर्मिती करण्यात आली. या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गुजरात, आंध‘प्रदेशसह इतर राज्यांतून हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. यावर्षी संस्थानतर्फे पुरुषोत्तम महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक‘म 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर होत आहे. गुरुवार, 29 सप्टेंबरला यवतमाळचे प्रसिद्ध गायक जितू महाराजांचा भव्य जगराता आयोजित केलेला आहे. 3 ऑक्टोबरला गावामधून भव्य दिंडी निघणार असून 4 तारखेला महाप्रसाद असणार आहे. क वर्ग तीर्थक्षेत्रांमधून संस्थानला निधी मंजूर झाला असून येथील भक्त निवासाचे काम चालू आहे.