जिल्ह्यात गाईंचे मोफत लसीकरण

2 लाख 92 हजार लसीकरण पूर्ण

    दिनांक :26-Sep-2022
|
गोंदिया, 
लम्पी  (Lumpy vaccine ) रोग होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात व्यापक प्रमाणात पशुधनाचे मोफत लसीकरण सुरु केलेले आहे. या लसीकरणातंर्गत जिल्ह्यातील एकूण कार्यरत 75 समुहांमार्फत 2 लाख 92 हजार गायवर्गाचे पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. श्रीधर बेदरकर यांनी दिली आहे.
 

hggj 
डॉ. श्रीधर बेदरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात या आजाराविषयी (Lumpy vaccine) व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली असून पशुपालकाने घ्यावेचे काळजी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. लम्पी आजाराबाबत जनांवरे आढळल्यास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात विना मूल्य उपचार देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत रोग प्रसार थांबविण्याकरीता रोग प्रसार करणार्‍या माशा, डास, गोचिड व चिडटे यांचा नायनाट करण्याकरीता कीटकनाशक औषधाची फवारणी करीत आहेत. लम्पी रोग होऊ नये म्हणून जिल्हयात व्यापक प्रमाणत मोफत लसीकरण करणे सुरु केलेले आहे. हे लसीकरण 75 समुहांमार्फत सुरु असून 2 लाख 92 हजार गाईंना पशुसंवर्धन विभागसमार्फत लसीकरण केले जाईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात पशुसंवर्धन चमू तयार करण्यात असून शेतकर्‍यांना गोठा फवारनी करण्याकरीता सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेळेवर उपचार केल्यास हा रोग निश्चित बरा होतो. अधिक माहितीसाठी पशुपालकांनी नजिकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना व पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. श्रीधर बेदरकर यांनी केले आहे.