महाज्योतीच्या योजनांचा लाभ घ्यावा

तांडा सुधार समितीचे आवाहन

    दिनांक :26-Sep-2022
|
मानोरा, 
तालुका आणि राज्यातील इतर Mahajyoti मागासवर्गीयाच्या ओबीसी, विमुक्त जाती व भटया जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट ०१९ ला करण्यात आली असून, या संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा लाभ भटके विमुक्त, ओबीसी व विशेष मागासवर्गीय संवर्गानी घ्यावा, असे आवाहन अभा तांडा सुधार समितीच्या वतीने महासचिव नामा बंजारा यांनी केले आहे.
 

fg 
सदर संस्था महाराष्ट्रातील Mahajyoti  इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटया जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांतील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृध्दी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐय व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक कटिबद्ध समाज निर्मितीकरीता स्वतःस समर्पित करण्यास कटिबद्ध आहे. परंतु महाराष्ट्रातील उपरोक्त संवर्गामध्ये या संस्थेमार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांची फारशी माहिती नाही, अशी खंत नामा बंजारा यांनी व्यक्त केली.