‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’

पहिल्या दिवशी महिलांची आरोग्य तपासणी

    दिनांक :26-Sep-2022
|
गोंदिया, 
नवरात्री उत्सवानिमित्त Medical check-up जिल्ह्यात 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीयांच्या आरोग्य  Medical check-up तपासणीसाठी 26 सप्टेंबरपासून 18 वर्षावरील महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या आरोग्य अभियानात जास्तीत जास्त महिलांनी आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुडे यांनी केले आहे.
 

ghghjh  
या उपक्रमांबद्दल माहिती देताना जिल्हा परिषदेचे मुख्य (Medical check-up) कार्यकारी अनिल पाटील म्हणाले, जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी आशा, अंगणवाडी व आरोग्य सेविका, सेवक यांनी घरोघरी जाऊन शिबीरे व उपलब्ध सुविधेबाबत माहिती द्यावी, कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा व स्थानिक पातळीवर सभांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उपकेंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी मार्फत मातांची तपासणी, समुपदेशन हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. समुदाय आरोग्य अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष भेट देऊन माता तपासणी, गरोदर माता तपासणी, समुपदेशन 18 वर्षावरील महिलांची तपासणी करतील.
 
त्यासाठी अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत तपासणी (Medical check-up) शिबिरे घेण्यात येतील. आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भीय करण्यात येणार असून आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात दररोज नवरात्रीच्या कालावधीमध्ये 18 वर्षावरील महिलांची तपासणी करून उपचार केला जाणार आहे. यामध्ये 18 वर्षावरील महिला यांचे आरोग्याविषयी समुपदेशन केले जाणार आहे. तसेच त्यांची सर्वांगीण तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. तसेच याच बरोबर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिबीरे आयोजित करुन आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत नेमिया मुक्त भारत कार्यक्रमांतर्गत सर्व अठरा वर्षावरील महिलां व शाळा व शाळाबाह्य मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.