दुप्पट रकमेच्या मोहात 45 लाख गमावले!

-एफडीच्या नावावर महिलेची फसवणूक
-कपीलनगरात बहिण भावाचा गोरखधंदा
- मुदत ठेवीचे दिले बनावट कागदपत्रे

    दिनांक :26-Sep-2022
|
नागपूर, 
कमी वेळात श्रीमंतीचे स्वप्न पाहणारे शक्कलबाज Money stolen मोहजाळ फेकतात. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला दृष्टी असूनही तो आंधळ्या सारखा वागतो. त्याला सत्य दिसत नाही. विचार करण्याची क्षमता नष्ट होत जाते, चांगल्या वाईटाची ओळख नसते. शक्कलबाजांचे जाळे येवढे मजबूत असते की बुध्दीजीवीही त्यांच्या गळाला लागतात. असाच काहीसा प्रकार कपील नगर पोलिस ठाण्याअंतर्गत घडला. शक्कलबाज बहिण भावाने मिळून एका दिव्यांग महिलेची 45 लाख रूपयाने फसवणूक केली. पाच वर्षात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना बँकेचे बनावट कागदपत्रे दिले.
 
 
gh
 
नवनीत गजभिये (35) आणि प्रियदर्शनी गजभिये (38), रा. बँक कॉलनी, Money stolen अशी आरोपी बहिण भावाचे नाव आहे. पुढच्याला ठेच लागली की मागचा शहाणा होतो, अशी म्हण आहे, परंतु, मोहाच्या जाळ्यात अडकलेला व्यक्ती शहाणा होताना दिसत नाही, असे फिर्यादी महिलेच्या बाबतीत घडले. एनआयटी गार्डन निवासी फिर्यादी महिला माया शंभरकर (48) यांना तीन महिणी आणि एक भाउ आहेत. वडिल पाच वर्षांपूर्वी बँकेतून निवृत्त झाले. ही माहिती आरोपी बहिण भावाला मिळाली. त्यांनी फिर्यादी शंभरकर यांच्याशी ओळख केली. मैत्री करून जवळीक साधली. नवनीतने त्याची बहिण एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असून तिचे पती सुध्दा बँकेत आहेत अशी बतावणी केली. बँकेत दिव्यांगाकरीता वेगवेगळ्या योजना आहेत. पाच वर्षात दुप्पट रक्कम होते. अशी थाप मारून फिर्यादीला जाळ्यात ओढले. पाच वर्षात 90 लाख रूपये मिळतील, अशा मोहात फिर्यादी महिला पडली. 2017 पासून टप्प्या टप्प्याने बहिण भाउ आणि आरोपी चैतन्य मौंदेकर (28), रा. रमना मारोती, हितेश गजभिये (34), नारी उर्फ महेश गणवीर (32) व इतर तीन आरोपींनी संगणमत करीत फिर्यादी व त्यांची बहिण इतर नातेवाईक यांचे कडून वेळोवेळी मुदत ठेव म्हणून 45 लाख रूपये घेतले. विशेष म्हणजे एचडीएफसी बँकेचे मुदत ठेवीचे बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्र दिले. सखोल चौकशी नंतर ही कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिस ठाणे गाठून तक‘ार केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवनीतला अटक केली आहे.