मूर्तिजापूर शहर पोलिसांचे पथसंंचलन

    दिनांक :26-Sep-2022
|
मूर्तिजापूर,
दुर्गा उत्सवाच्या पर्वावर मूर्तिजापूर Murtajapur city शहर पोलिसांद्वारे शहरात पथसंचलन करण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत यांच्या उपस्थितीत शहरातील जुनी वस्तीपासून ते स्टेशन परिसरात सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने पोलिसांनी पथसंचलन केले.
hjhg 
 
 कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, Murtajapur city कोणीही कायद्याचा उल्लंघन करू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. कायद्याचे उल्लंघन, शांतता बाधित केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणेदार सचिन यादव यांनी याप्रसंगी दिला. यावेळी एपीआय राहुल देवकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक इंगळे, पोलिस कर्मचारी, खुफिया विभाग आणि होमगार्ड या पथसंचलनमध्ये सहभागी झाले होते.