वाशीम शहरात नवदुर्गेची उत्साहात स्थापना

दांडीया, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल

    दिनांक :26-Sep-2022
|
वाशीम, 
मांगल्य, पावित्र आणि उत्साहाचे प्रतिक असणार्‍या Navratri दुर्गोत्सवास सोमवार, २६ सप्टेंबर पासून सुरूवात झाली आहे. सायंकाळी विधीवत पुजा अर्चा करुन घटनास्थपना करण्यात आली. नऊ दिवसाच्या या काळात सर्वत्र मातेचा गजर ऐकावयास मिळतो. तसेच शहरात भाविकांची रेलचेल असते. रस्ते गर्दीने फुलून जातात.
 

gfhgj 
कोरोना दोन वर्षाच्या संकटानंतर यंदा नवरात्रौ उत्सव Navratri निर्बधमुक्त साजरा करण्यात येणार आहे. सतत नऊ दिवस चालणार्‍या महोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या जल्लोषाचा आनंद लुटण्यासाठी दांडियाप्रेमींसह भाविक सज्ज आहेत. वाशीम शहरात गणेशोत्सवाइतकेच दुर्गाउत्सवाला महत्व आहे. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने प्रवचन, व्याख्यान, कीर्तन अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शहरातील काही मंडळांनी आकर्षक व मनमोहक देखावे तयार करण्याला पसंती दर्शविली आहे. शहराचे आराध्य दैवत श्री चामुंडा देवी माता याठिकाणी दरवर्षी प्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देव्हाळा संस्थान रेणुकामाता येथे सुध्दा नवरात्रौ उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रति माहुर ची देवी म्हणून देव्हाळा येथील रेणुका मातेचा नामोल्लेख पुराणात आहे. त्यामुळे याठिकाणी दुरवरुन भाविक दर्शनासाठी येतात. शहरासह ग्रामीण भागातही नवदुर्गेची व घरोघरी भक्तीभावाने घटस्थापना करण्यात आली.
 
या उत्सवाच्या Navratri काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबधीत राहावी, यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरिक्षक आदीसह पोलिस यंत्रणा चोख बंदोबस्त ठेऊन आहे. दुर्गा उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.