साखरखेर्डा येथील महालक्ष्मी मंदीरात नवरात्र उत्सव

    दिनांक :26-Sep-2022
|
साखरखेर्डा, 
Navratri festival : येथे सन 10 व्या शतकातील महालक्ष्मीचे हेमाडपंथी मंदिर 20 व्या शतकापर्यंत अस्थित्वात होते . आज या मंदीराचा पुनरजिर्नोद्वार करण्यात आला आहे . नवरात्र उत्सव येथे मोठ्या भक्तीभावाने साजरा होतो.
 
Navratri festival
 
साखरखेर्डा या गावाचे नाव 10 व्या शतकात खेटकपूर असे नाव होते . दंण्डक आरण्यात खेटकासुर नावाचा राक्षस राहातं होता . त्याचा त्रास या भागातील नागरिकांना होत असे . त्याकाळी ऋषींनी तपश्चर्या करून महालक्ष्मीचा धावा केला होता . साक्षात महालक्ष्मी प्रकट होऊन खेटकासुर राक्षसाचा वध केला होता . अशी पोथी पुराणात यांची नोंद आहे . चांगाडी शिवारात एक छोटेसे गाव होते . पुर्वेला गुंजमाथा , पश्चिमेला खेडी , मध्ये खेटकपूर अशी दण्डक आरण्यातील गावे होय . साथीच्या रोगामुळे आणि आदिल शाह , निजाम शाह यांच्या आक्रमणाने ही गावे फक्त नकाशावर राहिली . खेडी मात्र कायम होती . पुढे खेडीचे फत्तेखेर्डा म्हणून निजामशाहीत नामात्तर झाले . पुढे स्वातंत्र्य पुर्व काळात पुन्हा साखरखेर्डा हे नाव देण्यात आले.
 
 
महालक्ष्मी मंदीर हे हेमाडपंथी मंदिर होते . या मंदिराच्या परिसरात जिवंत पाण्याची गो- मुखातून धार वाहात होती . गावातील महिला याच धारेवरुन पाणी पिण्यासाठी आणत . 1972 साली दुष्काळ पडला होता . त्यावेळी महालक्ष्मी मंदिर हटवून त्या ठिकाणी महालक्ष्मी तलावाची निर्मिती करण्यात आली . मंदिरातील मुर्ती मंदीरासमोरील खंगर झालेल्या एका भव्य राजवाड्यात ठेवण्यात आली होती . तलावाच्या मधोमध मंदीर येत असल्याने ते मंदीर पाडण्यात आले . कालांतराने पैनगंगा सहकारी सुत गिरणी स्थापण करण्याचा निर्णय सहकार महर्षी भास्करराव शिंगणे यांनी घेतला . परंतू प्रथम या गावचे दैवत महालक्ष्मी मंदीर उभारण्याचा संकल्प त्यांनी केला . आणि काही दिवसात मंदीराचे बांधकाम पुर्ण करुण महालक्ष्मीची स्थापणा केली . आज महालक्ष्मी तलावाच्या पायथ्याशी हे मंदीर असून नवरात्र उत्सवात महिलांची मोठी गर्दी येथे असते.