महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानी ठेव

- महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे रेणुकामातेला साकडे

    दिनांक :26-Sep-2022
|
तभा वृत्तसेवा 
श्रीक्षेत्र माहूर, 
महाराष्ट्रातील सर्व जनतेला (People of Maharashtra) सुखी, समाधानी ठेव, त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभू दे, शेतकरी सर्वार्थाने सुखी होऊ दे असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्री रेणुकामातेला साकडे घातले.
 
People of Maharashtra
 
घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंदिरात जाऊन सपत्नीक रेणुका मातेची विधिवत पूजाअर्चा केली. विधीचे पौरोहित्य अरविंद देव व विजय आमले यांनी केले. मंदिर कार्यालयात संस्थानचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर, सचिव तथा अपर जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.
 
 
दर्शनानंतर श्री रेणुका मंदिराच्या पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष दिगंबर घोगरे, उपाध्यक्ष गोविंद आराध्ये, विनोद भारती यांनी विखे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी प्रसार माध्यमांशी चर्चा करताना यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने माहूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खरीप पिकांसह नदीनाल्या काठची जमीन खरडून गेल्याने त्याची भरपाई करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे हे म्हणाले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला सर्वकाही दिले आहे, त्यावर समाधानी असल्याचे महसूलमंत्री म्हणाले. याप्रसंगी त्यांचे समवेत खासदार प्रताप चिखलीकर, माहूरचे योगी श्यामबापू भारती महाराज, विजय आमले, समर त्रिपाठी, पद्मा गिर्‍हे, अर्चना दराडे, नंदकुमार जोशी, अशोक जोशी, संजय बनसोडे, पुरुषोेत्तम लांडगे, भागवत देवसरकर, डॉ. पद्माकर जगताप, अविनाश टनमने आदींची उपस्थिती होती.