पं. उपाध्याय एकात्म मानवतावादाचे पुरस्कर्ते- पुस्तोडे

    दिनांक :26-Sep-2022
|
अर्जुनी मोर, 
पंडित दीनदयाल उपाध्याय हे थोर विचारवंत Pt. Upadhyaya  व चिंतक होते. देश विकासाच्या अनेक मुद्यांवर त्यांनी चिंतन केले, विचार मांडले. जातपात धर्मभेद यापेक्षा राष्ट्र मोठे, राष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी समरस व्हा. जातीधर्मापेक्षा मानवतावाद महत्वाचा असमन एकात्म मानवतावादाचे समर्थन केले. पंडितजींच्या विचारांना अंगीकारून आपण नवा भारत घडवू, असे प्रतिपादन पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे यांनी केले.
 

ytyu 
 
ते स्थानिक तालुका भाजप कार्यालयात पं. दीनदयाल उपाध्याय Pt. Upadhyaya  यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडितजींच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी तालुकाध्यक्ष विजय कापगते नगरसेवक एसकुमार शहारे, राधेश्याम भेंडारकर, पंस सदस्य संदीप कापगते, लैलेश्वर शिवणकर, नितीन नाकाडे, संदीप फुंडे, व्यंकट खोब्रागडे उपस्थित होते.