रासेयो ही एक युवा चळवळ

आदर्श महाविद्यालय रासेयो दिन उत्साहात

    दिनांक :26-Sep-2022
|
देसाईगंज,
आपल्या देशाचा Raseyo आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका असून देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य रासेयोतून होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर रासेयो उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय, असे प्रतिपादन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश हलामी यांनी केले.
 

hgfghj  
 
आदर्श कला  Raseyo वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित रासेयो स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजू चावके तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अमोल बोरकर उपस्थित होते.
 
अध्यक्षस्थानावरून Raseyo बोलताना डॉ. राजू चावके यांनी स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कसे रुजवितात याबद्दल मार्गदर्शन केले. प्रास्ताविकेतून प्रा. अमोल बोरकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिवस का साजरा केला जातो यामागची पार्श्‍वभूमी सांगीतली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रासेयो विभागांतर्गत कोविड -19 चे बुस्टर डोज वितरणाचे आयोजन करण्यात आले. संचालन प्रांजली ढोरे तर आभारप्रदर्शन अखिलेश सहारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविकांनी सहकार्य केले.