रासेयो समाजऋण परतफेड भावना

    दिनांक :26-Sep-2022
|
आरमोरी, 
जगात सेवा Raseyo या शब्दाला महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीने जीवन केवळ स्वतःपुरते Raseyo जगण्यासाठी बंदिस्त न करता समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून जगायला पाहिजे. हीच भावना राष्ट्रीय सेवा योजनेतून निर्माण होते आणि रासेयो निर्मितीचा उद्देशसुद्धा समाजऋण परतफेडीची भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत करणे हाच आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले.
 

dfghghh 
स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य (Raseyo) महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, रासेयो प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के, रासेयो अधिकारी डॉ. सीमा नागदेवे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. नोमेश मेश्राम, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शशिकांत गेडाम, शारीरिक शिक्षण, खेळ व क्रीडा विभागाचे संचालक डॉ. ज्ञानेश्‍वर ठाकरे, माजी रासेयो अधिकारी डॉ. विजय गोरडे, डॉ. गजेंद्र कढव उपस्थित होते.
 
पुढे बोलताना प्राचार्य (Raseyo) डॉ. लालसिंग खालसा यांनी छोट्या कार्यातून सुद्धा सेवा सिद्ध करता येऊ शकते. ती सेवा स्वतःपासून सुरूवात केली पाहिजे. जगातील अनेक दुखीतांचे जीवन समजून घेणे आणि त्यांची सेवा करणे, श्रमदान करणे आणि मानवतेचे कार्य करणे हे राष्ट्रीय कार्य आहे. याचे धडे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून संस्कारीत केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिबिरात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन राष्ट्रीय सेवेचे कार्य तत्परतेने करावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सीमा नागदेवे तर आभारप्रदर्शन प्रा. सतेंद्र सोनटक्के यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. दिलीप घोनमोडे, प्रशांत दडमल, सचिन काळबांधे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला डॉ. छगन मुंगमोडे, डॉ. मनोज ठवरे, डॉ. वसंता कहालकर, प्रा. सुनंदा कुमरे, प्रा. कविता खोब्रागडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.