पाकिस्तान जिंदाबाद आणि रस्ता रोको

    दिनांक :26-Sep-2022
|
सिंदखेडराजा, 
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Road block) विरूद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईच्या विरोधात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही देशद्रोहींनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याने सर्वत्र संतापाची व निषेधाची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
सिंदखेडराजा येथे आज दि. 26 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको ठिय्या आंदोलन करून संताप व्यक्त केला.
 

AAA  
पाकिस्तान जिंदाबादच्या (Road block) घोषणा देणार्‍या विरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. घोषणा देणार्‍या संघटनावर बंदी घातली पाहिजे या मागणीसाठी आज सकाळी 10 वाजता सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयासमोर मनसेने रास्ता रोको आंदोलन केले मनसेचे जिल्हाअध्यक्ष शिवा पुरंदरे आणि विधानसभा अध्यक्ष सिद्धू गव्हाड यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी आंदोलकांना ताब्यात घेतले.