कालबाह्य झालेले रस्ता दाबणी यंत्र बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावर....

    दिनांक :26-Sep-2022
|
बुलडाणा, 
येथील शासकीय बांधकाम विभागाच्या प्रवेश द्वारा वर कालबाह्य झालेल्या रस्ता दाबणी यंत्र (Road roller) भंगार मध्ये विकण्यापेक्षा नविन पिढीला जून्या यंत्राची माहिती हवी या हेतूने उपकार्यकारी अभियंता राजेश एकडे यांच्या संकल्पनेतून तसेच कार्यकारी अभियंता रविकांत काळवाघे यांच्या पुढाकाराने रंगरंगोटी करून दिमाखात उभा आहे.
Road roller 
 
ऐरवी प्रशाननातील भंगार झालेल्या वस्तू वाहने लिलावात विक्री काढल्या जातात परंतु कल्पक उपकार्यकारी अभियंता राजेश एकडे यांनी यांनी उपविभाग बांधकामचा कायापलट करण्यासोबतच भंगारात धुळखात पडलेला रोड रोलर प्रवेशद्वारावर सर्वांना पाहण्यासाठी उभा केला. अभियांत्रीकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना नविन यंत्र युगात जुन्याकाळात वापरात आलेले यंत्राची माहिती व्हावी तसेच यत्रांची जपवणूक व्हावी हाच सकारात्मक उद्देश असल्याचे कार्यकारी अभियंता राजेश ऐकडे यांनी तभा प्रतिनीधीशी संवाद साधतांना सांगितले आहे.