14 शाळेतील विद्यार्थी गणवेशाविना

पालिका उदासिन

    दिनांक :26-Sep-2022
|
गोंदिया,
गोंदिया नगर पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये 14 कॉन्व्हेंट (School Uniform) सुरु करण्यात आल्या आहेत. पालकांनी मोठ्या संख्येने आपले पाल्य या शाळेत दाखल केले. शाळा सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र आतापर्यंत गणवेश व साहित्यचा पुरवठा करण्यात आला नाही. यासंदर्भात पालकांनी अनेकदा पाठपुरावा केला. परंतु वेळ मारुन नेली जात आहे. त्यामुळे पालकांत असंतोष असंतोष उफाळत आहे.
 

sdsd  
प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शहरात पालिकेच्या शाळांना (School Uniform) मागील वर्षात उतरती कळा लागली होती. त्यातच खासगी शाळा मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. पालिकेच्या शाळांचा खालावलेला दर्जा व खासगी शाळांतील गुणवत्ता पूर्ण शिक्षणामुळे पालकही पाल्यांना खासगी शाळांत प्रवेशाला प्राधान्य देऊ लागली. परिणामी पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावली. शाळांकरिता बांधलेल्या इमारती व मैदाने ओस पडले. दरम्यानच्या कालावधीत पालिकेच्या शाळांना जुने दिवस प्राप्त करण्याचा प्रयत्न म्हणून शाळांमध्ये कॉन्व्हेंट सुरु करण्यात आले. शहरातील विविध भागांत आजघडीला पालिकेचे 14 कॉन्व्हेंट सुरु आहेत. त्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणार्‍यांना विद्यार्थ्यांना गणवेश व इतर साहित्य पुरविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र यंदा सत्र सुरु होऊन तीन महिने लोटले असताना विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य पुरविण्यात आले नाही. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पालकांनी याबाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र आश्वासनाव्यतिरिक्त अद्याप काहीह होऊ शकले नाही. तत्काळ गणवेश व साहित्य पुरविण्यात यावे, अशी पालक व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
पुरवठाधारकाकडून होतोय विलंब
पालिकेद्वारे संचालित कॉन्व्हेंटमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना (School Uniform) गणवेश व इतर साहित्य पुरविण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदेची सोडत देखील काढण्यात आली. मात्र पुरवठादाराने गणवेशचा पुरवठा केला नाही. कशामुळे विलंब झाला त्याचे कारण विचारुन लवकरच गणवेश पोचते करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी सांगितले.