मजुरांच्या वाहनाला स्कार्पियोची धडक, १२ जखमी

    दिनांक :26-Sep-2022
|
वर्धा,
Scorpio collides शेतात मजुर घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाला भरधाव स्कार्पियोने धडक दिली. या अपघातात मालवाहू मधील चालकासह 10 महिला जखमी झाल्या. तर स्कार्पिओ मधील दोन व्यक्ती गंभीर असे एकूण 12 लोक जखमी झाले आहे. ही घटना देवळी मार्गावर काल सायंकाळी घडली. स्थानिकांनी जखमींना तातडीने सावंगी रुग्णालयात हलविले. 

waras 
 
सालोड (हिरापूर) येथील विजय दाते यांनी यंदा भाड्याने शेती केली. त्या शेतात आज खत टाकण्याचे काम होते. त्यासाठी विजय दाते यांनी आपल्या पत्नी मुलासह अन्य असे दहा जण सालोड येथून मालवाहुने शेताकडे निघाले. दरम्यान वर्धा देवळी महामार्गावर जयस्वाल यांच्या धाब्याजवळ वर्धेवरून देवळीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या Scorpio collides स्कार्पियोने मालवाहू वाहनाला जबर धडक दिली. यात मालवाहू ऑटो रस्त्याच्या कडेला जाऊन धडकला तर स्कार्पिओ शंभर मीटर लांब जाऊन उलटली. या अपघातात मालवाहू चालक विजय दाते यांच्यासह मनीष दाते, जया दाते, आदित्य घडमोडे, अनिता घडमोडे, सीमा खोबरे, रेखा वरठी सह अन्य तीन मजूर जखमी झाले. तर जीपमधील चालकासह अन्य एक अशी दोघे जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी सावंगी पोलिसात नोंद घेण्यात आली.