मालेगावातील स्वयंभू श्री तुळजाभवानी

    दिनांक :26-Sep-2022
|
 bnhia
 
बळीराम अन्नसत्रे
मालेगाव, 
मालेगाव शहरातील केळी रस्त्यालगत Tuljabhavani श्री तुळजाभवानीचे मंदिर आहे. या मंदिरातील श्री तुळजाभवानीची मूर्ती स्वयंभू आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या कळसाची उंची ३१ फुट असून, मंदिराचे गर्भगृह तुळजापूर येथील गर्भगृहा सारखे आहे. गर्भगृहात देवीवाहन सिंहाची मूर्ती कोरलेली आहे. गर्भ गृहातील श्री तुळजाभवानीची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरालागत श्री विठ्ठल रुक्मिणी व शिव मंदिर आहे. या मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री गणेश, श्री निलनाग, श्री हनुमान, शिव वाहन नंदी यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत.श् ाी तुळजाभवानी मंदिरासमोर आसारमाताच्या मुर्ती स्थापन केल्या आहेत. श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या दक्षिणेला औदुंबराच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरासमोर सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरा लगत श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आहे. मंदिरा समोर स्व. तुळजाराम गाभणे यांचे मंदिर आहे. मालेगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाजवळ हे मंदिर आहे. संस्थानवर चैत्र व शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संस्थान वर देवीच ेभाविक दर मंगळवारी दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी उपस्थित राहतात.