अकोला शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

-स्कॉडा ऑटोमेशन प्रणालीचे कार्यान्वयन

    दिनांक :26-Sep-2022
|
अकोला,
अकोला पाणीपुरवठा योजनेच्या महान येथील Water supply जलशुद्धीकरण केंद्रात प्रकल्पातून पाणी आणणार्‍या जलवाहिनीवरील व्हॉल्ववर स्कॉडा ऑटोमेशन प्रणालीअंतर्गत कामाला सुरुवात होणार आहे. या कामासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याकारणाने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस अर्थात बुधवार, 28 आणि गुरुवार, 29 सप्टेंबर रोजी बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
 
ghjgh 
 
अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा Water supply सबलीकरणाच्या कामात स्कॉडा ऑटोमेशन प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील व्हॉल्व स्वयंचलित करण्यासह विविध कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शहरातील जलकुंभ भरण्याचे व्हॉल्वही स्वयंचलित केले जाणार आहे. या योजनेचे काम जवळपास 65 टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याचेही सांगण्यात आले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीने जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. या जलवाहिनीवरील व्हॉल्व स्वयंचलित करावयाचा असल्याने तुर्तास पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.