माता सुरक्षित तर घर सुरक्षित

महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय

    दिनांक :26-Sep-2022
|
बुलडाणा, 
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाची सुरवात बुलढाणा जिल्ह्यातील स्वतंत्र महिलांसाठी Women safety शासकीय स्त्री रुग्णालंय आजपासून सेवेत सुरु झाले असून या रुग्णालयात महिलांसाठी बाह्यरुग्ण तपासणी विभाग सुुरु कण्यात आले आहे. खा. प्रतापराव जाधव व आ. संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस व अन्य वैद्यकीय अधिकार्‍यांना उपस्थित तपासणी विभागाचे उदघाटन करण्यात आले.
 

dsd 
 
जिल्हा परिषदेच्या मुकाअ भाग्यश्री विसपुते यांना फित कापण्याचा सन्मान देण्यात आला एक महिना महिलांसाठी Women safety बाह्यरुग्य तपासणी विभाग सुुरू राहणार असून त्यानंतर अद्यावत सुविधा स्त्री महिला रुग्णलयात सुुरू करणार असल्याची माहिती स्त्री महिला रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वासेकर यांनी दिली आहे. महिलांसाठी बुलढाण्यात सुसज्ज स्त्री रुग्णालय मागील दोन वर्षाअगोदर बांधण्यात आले होते. त्याच वेळी रुग्णालयामध्ये सर्व आरोग्य यंत्र सामुग्री आणल्या गेले होते मात्र कोरोनाचा आजार आल्याने गेल्या दोन वर्षा पासून कोरोनाच्या रुग्णांसाठी ह्या स्त्री रुगणलायाला कोविड रुग्णालय वापरण्यात येत होते. मात्र आत्ता कोरोना आटोक्यात आल्यानंतर माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाच्या निमित्ताने या उदघाटन कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस व अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.