29 व 30 सप्टेंबर रोजी उद्योजकांसाठी कार्यशाळा

    दिनांक :26-Sep-2022
|
अकोला, 
Workshop : उद्योग विभाग व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा दि अकोला अर्बन को ऑपरेटिव्ह, बँक सभागृह, तोष्णीवाल ले आऊट, अकोला येथे गुरुवार, 29 व शुक्रवार, 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

Workshop 
 
या कार्यशाळेत उद्योग विभागाच्या अधिकार्‍यामार्फत गुंतवणूक वृद्धी, निर्यात प्रचलन आणि एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्योजकांना येणार्‍या समस्यांबाबत परिसंवादाद्वारे समस्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच उद्योग विभागाचे सहकार्याने उद्योग सुरू केलेल्या उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात येणार आहे. तरी उद्योजकांनी कार्यशाळा व प्रदर्शनाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी केले आहे.