नवी दिल्ली,
अनिल कुमार लाहोटी (Anil Kumar Lahoti) यांनी रेल्वे मंडळाचे नवे अध्यक्ष आणि मु‘य कार्यकारी अधिकारी पदभार स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लाहोटी यांच्या या नियुक्तीला मान्यता दिली. याआधी लाहोटी रेल्वे मंडळाचे सदस्य होते. लाहोटी हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनीयर्सच्या 1984 च्या तुकडीतून उत्तीर्ण झाले आहेत तसेच ते भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेच्या लेव्हल-17 च्या पहिल्या पॅनेलमध्ये समाविष्ट होते.
अनिल कुमार लाहोटी (Anil Kumar Lahoti) त्यांनी माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स, ग्वाल्हेर येथून सिव्हिल इंजिनीयरिंगमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे आणि रुरकी विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये (स्ट्रक्चर्स) पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. रेल्वेमधील त्यांच्या 36 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारकिर्दीत त्यांनी मध्य, उत्तर, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे तसेच रेल्वे बोर्डात विविध पदांवर काम केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. काही महिने त्यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.