न.प.च्यावतीने सावित्री-जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

- दहा दिवस सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाची मेजवानी

    दिनांक :01-Jan-2023
Total Views |
सिंदखेडराजा, 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब (Savitri-Jijau) यांचा नगरपरिषदच्या वतीने भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळा सिंदखेडराजा येथील संत सावता भवन येथे 3 ते 12 जानेवारी यादरम्यान संपन्न होणार आहे. दररोज विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
Savitri-Jijau 
 
मागील दोन वर्षापासून सतत कोरोना असल्यामुळे माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा (Savitri-Jijau) छोट्या स्वरूपात साजरा करण्यात आला होता. यावर्षी नगर परिषदेच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ 3 जानेवारी रोजी संध्याकाळी या मतदार संघाचे आ. डॉ. राजेंद्र शिंगणे व माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचा उद्घाटन समारंभ पार पाडणार आहेत तसेच सायंकाळी 7:30 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच 4 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता ह भ प सोहम महाराज काकडे यांचे श्री हरी कीर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
 
 
5 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान दररोज संध्याकाळी विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संत सावता भवन या ठिकाणी दररोज संध्याकाळी 7 वाजता. साजरा करण्यात येणार आहेत दरम्यान या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन दररोज शहरातील मान्यवर मान्यवरांच्या हस्ते शहरातील डॉक्टर, पत्रकार वकील, साफसफाई कामगार, माजी सैनिक व आजी-माजी अध्यक्ष उपाध्यक्ष तथा नगरसेवक यांच्या हस्ते पार पडणार आहेत. 3 ते 12 जानेवारीपर्यंत झालेल्या विविध कार्यक्रमाचा गुणगौरव समारंभ व सत्कार व बक्षीस वितरण या ठिकाणी पार पाडण्यात येणार आहेत.
 
 
तसेच 12 जानेवारी रोजी सुर्योदय समयी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त (Savitri-Jijau) पालकमंत्री गुलाबराव पाटील खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ राजेंद्र शिंगणे, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर आ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, माजी आ. तोताराम कायंदे, माजी मंत्री रंजीत पाटील, आ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ राजेश एकडे, आ. श्वेता महाले आ. वसंत खंडेलवाल संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन राधेश्याम चांडक यांच्या विशेष उपस्थितीमध्ये महापूजा संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष सतीश तायडे उपनगराध्यक्ष भीमा पंडित जाधव मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह सभापती नगरसेवक नगरसेविका व तथा सर्व अधिकारी कर्मचारी नगरपरिषद यांनी केले आहेत.