नियमित वेतन न झाल्यास सामूहिक रजा आंदोलन

10 Jan 2023 20:31:16
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
आरोग्य विभागात health department कार्यरत कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचे गेल्या तीन ते चार महिन्यांपासूनचे वेतन यशस्वी अ‍ॅकडमी स्किल कंपनीने अदा केले नाही. या प्रकाराला कंटाळून डाटा एन्ट्री ऑपरेटर्सने जिल्हा परिषद आरोग्य विभागात धडक देऊन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना निवेदन दिले. त्वरित वेतन अदा न झाल्यास सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे.
 
health department
 
जिल्हा परिषद health department आरोग्य विभागाच्या अखत्यारीत डाटा एन्ट्री ऑपरेटची नेमणूक पुणे येथील यशस्वी अ‍ॅकडमी स्किल कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नेमणुकीनंतर वर्षभरात वेतनवाढ करण्याची शाश्वती कंपनीने दिली होती. सुरवातीला कंपनीने डाटा एन्ट्री ऑपरेटरचे नियमित वेतन अदा केले. मात्र, मागील काही महिन्यांपासून वेतन अदा केलेच नाही.
 
 
परिणामी, डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कामावर ये-जा करतानाही अडचणी जाणवत आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या ऑपरेटर्सनी जिप मु‘य कार्यकारी अधिकारी, health department आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांची मागील महिन्यात भेट घेतली होती. मात्र, कंपनीने अद्याप वेतन अदा केलेच नाही.
 
 
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या health department डाटा एन्ट्री ऑपरेटर्सनी जिल्हा आरोग्य विभागात धडक देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांची भेट घेतली. नियमित वेतन करण्याबाबत कंपनीला सूचना द्याव्या, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. आता नियमित वेतन न झाल्यास सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
Powered By Sangraha 9.0