तभा वृत्तसेवा
गोंदिया,
Maharashtra Express : आधीच गाड्यांच्या लेटलतीफीमुळे सर्वसामान्या प्रवासी मेटाकुटीस आला असताना आता गोंदिया व कोल्हापूर येथून सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस तीन दिवस रद्द करण्यात आली आहे. यामुळे शेकडो प्रवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. गोंदिया कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान 23 जानेवारीपर्यंतच्या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहे. याचा फटका महाराष्ट्र एक्सप्रेसला (Maharashtra Express) बसला असून 21, 22 व 23 जानेवारी रोजीची अप आणि डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रात म्हटले आहे.
ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांच्या संचालनावर परिणाम होणार आहे. कोल्हापुर व गोंदिया येथून सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस (Maharashtra Express) 21, 22 व 23 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस 7, 14 आणि 21 जानेवारी रोजी साईनगर शिर्डीहून सुटणारी रेल्वे रद्द करण्यात आली. भुसावळ-दौंड मेमु जेसीओ 5, 12 आणि 19 रोजी दौंडहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांचे मार्ग वळविले
निजामुद्दीन 23 जानेवारी रोजी निघणारी म्हैसुर, संत हिरादरम नगर, मकसी, नागदा, रतलाम, वडोदरा, वसई, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्ग म्हैसुरला जाईल. 22 जानेवारी रोजी सुटणारी हावडा- पुणे नागपुर, ब‘ारशाह, काझीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे पुण्याला जाईल. काकीनाडा 23 जानेवारी रोजी सुटणारी साईनगर शिर्डी सिकंदराबाद, वाडी, दौंड, पुणतांबा मार्गे साईनगर शिर्डीला जाईल. हटिया-पुणे 22 जानेवारी रोजी सुटणारी गाडी नागपुर, ब‘ारशाह, काझीपेठ, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे पुण्याला जाईल. पुण्याहून 23 जानेवारी रोजी सुटणारी लखनौ, लोणावळा, कर्जत, पनवेल, वसई, वडोदरा, रतलाम नागदा, संत हिरादरम नगर मार्गे लखनऊल जाईल. साईनगर शिर्डी 24 जानेवारी रोजी सुटणारी काकीनाडा, पुणतांबा, दौंड, वाडी, सिकंदराबाद मार्गे काकीनाडाला जाईल. कोल्हापूर 24 जानेवारी रोजी सुटणारी निजामुद्दीन रेल्वे पूणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, वसई, वडोदरा, रतलाम, नागदा संत हिरादरम नगर, भोपाळ मार्गे निजामुद्दीनला जाईल. पुणे-नागपुर 19 रोजी सुटणारी गाडी लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड नोगावला. मजला, जाईल, नागपुर पुणे 20 जानेवारी रोजी सुटणारी रेल्वे मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे पुण्याला जाईल. पुणे-अजनी 21 रोजी सुटणारी रेल्वे लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड मार्गे अजनीला जाईल. अजनी-पुणे 22 रोजी सुटणारी गाडी मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोणावळा मार्गे पुण्याला जाईल.