सिंदखेडराजा,
Jijau Srishti : राष्ट्रमाता जिजाउ माँ साहेबांच्या जन्मोत्सवासाठी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह संपुर्ण देशभरातुन लाखो जिजाउ भक्त मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीत दाखल होवुन जिजाउ माँ साहेबांचे चरणी लीन होतात. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त माँसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात कंपणीच्यावतीने जयंतीदिनी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात येणार आहे तसेच नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये व राजवाडा परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्मस्थळाची पवित्र माती आपल्या भाळी लावुन वर्षभरासांठीची उर्जा सोबत घेवुन जातात. दरम्यान येणार्या जिजाउ भक्तांची गैरसोय होवु नये म्हणुन वाहनतळ, दुकाने, हॉटेल, रंगरंगोटी करुन मातृतिर्थ नगरी सज्ज झाली असुन जिजाउ सृष्टीवर स्वच्छता, रंगरंगोटी, प्रकाशव्यवस्था करुन रोज सांस्कृतीक कार्यक्रम चालु आहे व संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी मराठा सेवा संघ 12 जानेवारीला जागतीक स्तरावरुन जिजाउ जन्मोत्सव सोहळयाचे आयोजन जिजाउ सृष्टी (Jijau Srishti) मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे करत असते. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील तसेच परदेशातुनही जिजाउ भक्तू सहभागी होतात. या वर्षी 12 जानेवारी 425 व्या जिजाउ जन्मोत्सव आयोजन करण्यात आले आहे. सूर्योदय समयी जन्मस्थळ राजवाडा ते जिजाउसृष्टी अनेक वारकरी दिंडयासह वारकरी दिंडीसोहळा सपन्न होईल. सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करून जिजाउसृष्टी येथील कार्यक्रमाची सुरूवात होईल.
ध्वजारोहणानंतर जिजासृष्टी (Jijau Srishti) सभागृह येथे कार्यक्रमांची सुरुवात होईल यामध्ये नामवंत शाहीरांचे पोवाडे, नवोदित वक्ते, सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष सत्कार, साहीत्य प्रकाशन सोहळा, सामुहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. मातोश्री मंगल कार्यालयात हा रोजगार मेळावा होणार आहे. यासाठी अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके मुंबई येथून हेलिकॉप्टरने येणार आहेत. माँसाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.