कारंजा लाड,
Sarsangchalak Mohanji Bhagwat धर्म म्हणजे काही गुढ जे सिध्द करता येत नाही, भोळेपणा अशी चुकीची समजुत जगामध्ये ३०० वर्षापासून पसरली आहे. धर्म म्हणजे अंधश्रध्दा व विज्ञान म्हणजे त्याला सर्वकाही माहिीत असून, सिध्द केलेल सर्व सत्यत असता अशीही चुकीची समजुत आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांनी केले. श्री चा ७२३ वा जन्मोत्सवा निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी कारंजा येथील गुरूमंदीरात येवून त्यांनी श्री गुरूमहाराजांचे दर्शन घेतले. यावेळी सर्वप्रथम मोहनजी भागवत यांचा श्री गुरूमंदीर संस्थानच्या वतीने शाल श्रीफळ व गुरूमहाराजांची प्रतिमा देउन सत्कार संस्थानचे अध्यक्ष विणुभाउ सोनटक्के, प्रकाश घुडे, अभय पारसकर, अविनाश खेडकर यांनी केला.

पुढे बोलतांना श्री मोहनजी भागवत Sarsangchalak Mohanji Bhagwat म्हणाले की, विज्ञानाचा संबध काम आणि अर्थाशी असून, धर्म हा एक वेगळा पुरुषार्थ आहे. पुजा, उपासना, साधना, परमेश्वराचा साक्षात्कार व त्यानंतर मोक्ष अशी खरी धर्माची व्याख्या आहे. विज्ञानाला धर्माचा विरोध असल्याचा समज चुकीचा आहे. पण जेथे विज्ञान कमी पडते तेथे धर्माची जोड आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीतील प्रथा - परंपरा विज्ञाननिष्ठ असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विज्ञान आणि अधात्म याचा अपसात विरोध नाही. परमेष्टीचा साक्षात्कार होण्याकरिता धर्माशिवाय पर्याय नसल्याचे सांगत जगाला हिंदुत्वाचा विचार देणे आपले कर्तव्य असल्याचे सांगत जगाला जीवन कसे जगावे याचा आदर्श उदाहरणातून देत देश विश्वगुरुपदी नेण्याकरीता आपण कार्यरत व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री नृसिंह स्वामी मंदिरात आयोजित जन्मोत्सव कार्यक्रमानिमीत्त सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत Sarsangchalak Mohanji Bhagwat यांनी मंदिरात दर्शन घेतले. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता त्यांचे कारंजा येथे आगमन झाले. दुपारी ४ वाजता उद्बोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष विजय सोनटक्के, कोषाध्यक्ष बाबा पारसकर, विश्वस्त अविनाश खेडकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अतूल बर्डे यांनी केले. विश्वस्त प्रकाश घुडे यांनी परिचय करुन दिला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.