सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्सव

11 Jan 2023 12:26:49
नागपूर,
सावित्रीबाई फुले नागरी सहकारी Savitribai Phule पतसंस्था हनुमान नगरच्या वतीने गृहिणी समाज सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगर पालिकातील समाज कल्याण विभागाच्या समूह संघटक ज्योत्स्ना धर्माळे देशमुख, माजी अध्यक्ष शारदा क्षत्रिय, संस्थेचे अध्यक्ष गिरीश हरकरे उपस्थित होते.
 
ggfh
 
लता कनाठे यांच्या मार्गदर्शनात Savitribai Phule लालबहादूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थिंनींनी स्वागत गीत, सावित्रीबाईंच्या जीवनावर ओव्या प्रस्तुत केल्या. मंजुश्री आटे, जयश्री गभने यांनी कविता वाचन केले. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद तसेच रा. स्व. संघ हनुमान नगर संघचालक ज्ञानेशवर बालपांडे आदी उपस्थित होते. हनुमान नगर गृहिणी समाज, भजन मंडळ, योगा मंडळ, गप्पा हास्य मंडळ, झुंबा ग्रूप, हिरकणी महिला मंडळ, चंदननगर महिला बचत गटाच्या जवळ जवळ १५० सावित्रीच्या लेकी कार्यक्रमात उपस्थित होत्या. संचालन आरती तांदुळकर यांनी केले. शुभांगी लांबाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय पिदडी, सदानंद शेटे, सुवर्णा मुळे, संकेत बागडदेव, प्रवीण पांडे, विकास खळतकर, श्रीधर निबंधे, दीपाली पिदडी यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0