धीरज लिंगाडे यांची उमेदवारी दाखल

12 Jan 2023 20:53:03
तभा वृत्तसेवा
अमरावती,
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या Dheeraj Lingade धीरज लिंगाडे यांनी गुरूवारी पदवीधर निवडणुकीसाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यांना महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षाचे समर्थन असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
 
Dheeraj Lingade
 
नामांकन अर्ज दाखल करण्याच्यापूर्वी वर्‍हाडे मंगल कार्यालयात नाना पटोले व Dheeraj Lingade मविआतल्या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत सभा झाली. या सभेला उबाठा शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री सुनील देशमुख, आमदार वझाहत मिर्झा, आमदार बळवंत वानखडे, माजी खासदार अनंत गुढे यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पटोले म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या विरोधातला असंतोष पदवीधर निवडणुकीतून प्रगट होणार आहे. काँग्रेचा उमेदवार हमखास या निवडणुकीत विजयी होईल. मविआतले सर्व नेते व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे. मोठ्या फरकाने लिंगाडे यांना आपल्याला विजयी करायचे आहे. त्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी, उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रमाणीक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. धीरज लिंगाडे यांनीही आपली भूमिका मांडली. कर्मचार्‍यांना जुनी पेंशन मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगून पदवीधरांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
प्रजापती निवडणुक लढणारच
काँग्रेसने शिवसेनेतल्या व्यक्तीला आयात करून उमेदवारी दिली. या कृतीने मी नाराज झालो असून काँग्रेस पदवीधर सेल प्रमुखाचा राजीनामा दिला व अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. Dheeraj Lingade कोणत्याही परिस्थितीत ही निवडणुक लढणारच असल्याचे श्याम प्रजापती यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेऊन जाहीर केले. काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्‍यांचे व कार्यकर्त्यांचे समर्थन मला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केल्याचेही ते म्हणाले.
 
 
एकूण 34 जणांचे अर्ज
पदवीधर निवडणुकीसाठी 5 जानेवारीपासून नामांकन अर्ज दाखल करणे सुरू आले. 12 जानेवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी 13 जणांचे अर्ज आले. Dheeraj Lingade आता एकूण अर्ज दाखल करणार्‍यांची संख्या 34 झाली आहे. प्राप्त अर्जाची 13 जानेवारीला छाननी होणार असून 16 जानेवारीपर्यंत नामांकन अर्ज परत घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीतल्या रिंगणातील उमेदवार खर्‍या अर्थाने स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0