राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांकडून मॉ जिजाऊंना अभिवादन

    दिनांक :12-Jan-2023
Total Views |
सिंदखेडराजा, 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री Maa Jijau व स्वराज्य स्थापनेमागील प्रेरणास्त्रोत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजांनी मानवंदना दिली. राजे लखुजीराव जाधव यांचे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा शाखेचे वंशज, देऊळगाव राजा येथील श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी रोजी सकाळी पावणे पाच वाजता राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच आरती ओवाळून सपत्नीक पूजा करण्यात आली.
 
Maa Jijau
 
या मानाच्या Maa Jijau पूजेसाठी जवळखेड, उमरद, मेहुणाराजा, आडगाव राजा, किनगाव राजा येथील वंशज मनोजराजे, प्रभाकरराजे, पंकजराजे, प्रवीणराजे, संतोषराजे, विश्वजीतराजे, अभिजीतराजे, बाळूराजे, सुभाषराजे, गोपाळराजे यांची उपस्थिती होती. त्यांनीही मॉ जिजाऊंचे विधीवत पूजन करून आदरांजली वाहिली. अभिवादनानंतर राजवाड्यामध्ये श्री बालाजी संस्थानच्या वतीने शिवव्याख्याते ज्ञानदेव काशीद यांचे राजमाता जिजाऊ चरित्र व कार्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सतीश तायडे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
 
 
जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून Maa Jijau जिजाऊ भक्तांनी ठिकठिकाणी तोरण पताके लावून, रांगोळी काढून जन्मोत्सवाची जय्यत तयारी केली होती. सिंदखेड राजा येथे मॉ जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्र तसेच देशातील अनेक राज्यातून जिजाऊ भक्त मोठ्या संख्येने दाखल झालेले होते. जिजाऊ जयंतीच्या शुभ मुहूर्तावर इंदौर येथून आलेल्या, सिंदखेड राजा येथील पवित्र माती कलशामध्ये घेऊन जाणा-या रथाला राजे विजयसिंह जाधव व समस्त वंशजांनी स्वागत करून सिंदखेड राजा ते इंदौर पदयात्रेला सुरुवात करून दिली. ही पदयात्रा 400 किमीचा प्रवास करून इंदौरमध्ये मॉ जिजाऊंच्या नूतन मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे.