महेश कोठारे यांच्या आत्मचरित्राचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

    दिनांक :12-Jan-2023
Total Views |
मुंबई, 
मराठी चित्रपट सृष्टीत अनेक Mahesh Kothare  नवीन बदल घडविणारे धडाकेबाज अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे मराठी चित्रपट सृष्टीसाठीचे योगदान मोठे आहे. कोठारे यांनी मराठी प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटांशी जोडले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिवाजी मंदिर येथे अभिनेते. कोठारे यांच्या 'डॅम इट आणि बरंच काही' या आत्मचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मेहता प्रकाशनचे अखिल मेहता, संपादक मंदार जोशी, महाराष्ट्र बॅकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे उपस्थित होते.
 
fg
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महेश कोठारे Mahesh Kothare  यांच्या 'धुमधडाका'ने मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांनी मराठी चित्रपट पूर्णपणे बदलून टाकला. महेशजींनी नवीन पिढीला मराठी चित्रपटांशी जोडले. प्रत्येकाला हवाहवासा चित्रपट त्यांनी बनवला. तसेच 'डॅम इट' ही पंचलाईनही तेवढीच प्रसिद्ध केली. खूप नवे आणि वेगळे प्रयोग महेशजींनी केले. मराठी सिनेमा त्यांनी तांत्रिकदृष्ट्याही बदलला. त्यांनी व्यावसायिकतेने सिनेमे बनवले. त्यांनी आयुष्यातील चढ-उतार या पुस्तकात मांडले आहेत. जीवनप्रवास प्रामाणिकपणे मांडला आहे. त्रुटीही मांडल्या आहेत. दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीही यामध्ये आहेत. महेशजींनी सर्वांना सामावून घेत दृढतेने वाटचाल केली. अपयशानंतर यशही जिद्दीने गाठले. विविध माध्यमातून ते आजही कार्यरत आहेत. आणि नव्या पिढीलाही प्रेरणा देत आहेत, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अभिनेते आणि दिग्दर्शक कोठारे Mahesh Kothare म्हणाले, 'डॅम इट आणि बरंच काही' या माझ्या आत्मचरित्रातून मी माझा जीवनप्रवास व चित्रपट सृष्टीतील कारकीर्द प्रामाणिकपणे मांडली आहे. मित्रांच्या सहकार्याने मी अनेक संकटांवर मात करु शकलो. तरुणांसाठी हे नक्कीच मार्गदर्शक ठरु शकेल, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.'डॅम इट आणि बरंच काही' या आत्मचरित्राव्दारे अभिनेते कोठारे यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. याचे शब्दांकन आणि संपादन मंदार जोशी यांनी केले आहे. यावेळी महेश कोठारे यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील निवडक प्रसंग आणि प्रसिद्ध गाणी सादर करण्यात आली. महेश कोठारे यांच्या चित्रपट प्रवासातील वाटचालीबद्दल अभिनेते सचिन पिळगावकर आणि निवेदिता सराफ यांनी अनेक गमतीदार किस्से सांगितले.