फुलसावंगी,
नुकतीच फुलसावंगी येथे पत्रकार संघाची वार्षिक बैठक झाली. त्यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच सर्वानुमते पत्रकार Shailesh Wankhede शैलेश वानखेडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महागाव तालुक्यातील फुलसावंगी हे सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे जवळपास सर्वच वृत्तपत्राचे प्रतिनिधी पत्रकारितेचे काम करतात.
सर्वसामान्यांच्या मागण्या शासनासमोर मांडण्याचा एक माध्यम म्हणून वृत्तपत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. वृत्तपत्रात काम करीत असतांना गावातील सर्व वृत्तपत्र प्रतिनिधीने मिळुन काम करावे या उदात्त हेतूने येथे पत्रकार संघाची नावीन कार्यकारीणी गठीत करण्यात आली. यात Shailesh Wankhede शैलेश वानखेडे यांची फुलसावंगी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी विवेक पांढरे, डॉ. गजानन वैद्य, शे. तस्लिम, शेख अनिस, विजय पाटील, विवेक शेळके, चंद्रशेखर पंडागळे, संजय जाधव, सचिन छन्नीकर, शे. रिजवान, विक्की भिसे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.