येथे कै. मामासाहेब मोहोळ क्रीडा परिसरात आयोजित प्रतिष्ठेच्या 65 व्या (Maharashtra Kesari Shivraj Rakshe) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नांदेडच्या शिवराज राक्षेने पहिल्या दोन मिनिटात महेंद्र गायकवाडला चितपट करून अस्मान दाखविले आणि महाराष्ट्र केसरीचा मान मिळविला. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणार्या शिवराज राक्षेला चांदीची गदा व 14 लाखाची थार गाडी देण्यात आली. याशिवाय त्याला 5 लाख रूपयांचे रोख बक्षिस देण्यात आले. उपविजेत्या महेंद्र गायकवाडला अडीच लाख रुपये रोख बक्षिस व ट्रॅक्टर बक्षीस म्हणून देण्यात आले.
माती विभागाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखवर 6-4 अशा गुणांनी विजय नोंदवून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सिकंदर व महेंद्र यांच्यात एक-एक गुणासाठी चढाओढ सुरू असताना शेवटच्या मिनिटाला दोन्ही कुस्तीपटूंनी गुण मिळविण्यासाठी (Maharashtra Kesari Shivraj Rakshe) चांगलीच झटापट सुरू केली होती. एकमेकांवर पकड मिळविण्यासाठी दोन्ही कुस्तीपटू झुंजत होते. अखेर महेंद्र गायकवाडने एक गुण घेत कुस्ती जिंकली.
माजी विजेत्या हर्षवर्धनचा स्वप्नभंग
गादी विभागातील अंतिम लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने माजी विजेत्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरवर 8-2 अशा गुणांनी विजय नोंदविला व महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. या पराभवाबरोबरच हर्षवर्धनचे दुसर्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळविण्याचे स्वप्न भंग झाले. हर्षवर्धनने 2020 मध्ये महाराष्ट्र केसरीचे विजेतपद पटकावले होते. शिवराज राक्षेने प्रारंभापासूनच आक्रमक डाव खेळण्यास सुरुवात केली. शेवटच्या दहा सेकंदात (Maharashtra Kesari Shivraj Rakshe) शिवराजने टेक डाऊनचे 2 गुण मिळवित सामना 8-2 ने जिंकला.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व खासदार ब‘जभूषण शरण सिंह, महाराष्ट्राचे उपमु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजक मुरलीधर मोहोळ यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले.
महाराष्ट्र सरकारने मिशन ऑलिम्पिकसाठी मदत केली पाहिजे : बृजभूषण शरण सिंह
महाराष्ट्र सरकारने मिशन ऑलिम्पिकसाठी मदत केली पाहिजे. (Maharashtra Kesari Shivraj Rakshe) ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, तो दूर झाला पाहिजे. महिला महाराष्ट्र केसरी संदर्भात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषगदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी विचार केला पाहिजे, असे बृजभूषण शरण सिंह आपल्या भाषणात म्हणाले.
महाराष्ट्र केसरीपदाच्या मानासाठी गादी व माती विभागातील विजेते कुस्तीपटू (Maharashtra Kesari Shivraj Rakshe) यांच्यात अंतिम लढत होते. ही लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार गादीवर होते. अंतिम विजेत्या कुस्तीपटूस महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते. महाराष्ट्र केसरीला दिली जाणारी गदा सागाच्या लाकडापासून बनवली जाते. त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. या नक्षीकामासाठी 28 गेज चांदीचा पत्रा वापरला जातो. गदेचे वजन सुमारे 8 ते 10 किलो असते. गदेची उंची ही साधारण 27 ते 30 इंच असते. तिचा व्यास 9 ते 10 इंच असतो. या गदेवर एका बाजूला हनुमानाचे तर दुसर्या बाजूला कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते.