सावित्रीबाई फुले जयंती : भव्य रॅलीने दारव्हा दुमदुमले

14 Jan 2023 19:20:29
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
सामाजिक कार्यात वाहून घेणार्‍या तथा (Savitribai Phule) स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शहरातून काढलेल्या भव्य रॅलीने लक्ष वेधून घेतले. सावित्रीच्या लेकींनी दिलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. प्रारंभी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
 
Savitribai Phule
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (Savitribai Phule) अखिल भारतीय माळी महासंघ प्रांताध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, उदघाटक अष्टविनायक अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश राऊत, तर प्रमुख पाहुणे म्हणून समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विनोद इंगळे, सुनयना अजात, डॉ. वसंत उमाळे, प्राचार्य दत्तात्रय राहणे, माजी नगसेवक रवी तरटे, अ‍ॅड. राजेश चौधरी, माळी महासंघ जिल्हाध्यक्ष राजेंद्र घाटे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना उडाखे, प्रमोद राऊत, विठ्ठल नाकतोडे, परमेश्वर पुंड, समता परिषदेचे रामदास राऊत उपस्थित होते.
 
 
यावेळी रामगाव (रामेश्वर) येथील मयूर बुधे या युवकाने फुले (Savitribai Phule) दाम्पत्याच्या जीवनकार्यावर केलेल्या ओजस्वी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे औचित्य साधून माळी महासंघ प्रांताध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, नायब तहसीलदार विनोद शेंदुरकर, मुख्याध्यापक गोपाळ पुसदकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नवनियुक्त पदाधिकारी तालुका अध्यक्ष संतोष शेंदुरकर, प्रवीण काठोडे, प्रज्वल बंगळे, मोहन ढगे, वैभव गाडे, राजू हळदे आदी पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
दरम्यान शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. (Savitribai Phule) सामाजिक संदेश देणारी शिस्तबद्ध रॅली व घोषणांनी शहर दुमदुमून गेले. रॅलीमध्ये ग्रामीण भागातून महिला पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील सदाशिव व मयुरी उंबरकर, तसेच संत सावता माळी यांच्या वेशभूषेतील वेदांत संतोष उंबरकर यांनी लक्ष वेधून घेतले. याशिवाय सावी कथले व समृद्धी गोमासे या चिमुकल्यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली. प्रास्ताविक गोपाळ पुसदकर, संचालन अर्चना उडाखे तर आभार राजेंद्र घाटे यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0