नवी दिल्ली,
ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये एकापेक्षा एक सरस वाहने ठेवण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्ससह असलेली वाहनेही येथे लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यातील Solar powered electric car इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप वायवे मोबिलिटीने या प्रदर्शनात आपली नवीन सोलर पॉवर इलेक्ट्रिक कार वायवे ईव्हीए ठेवली आहे. ही देशातील पहिली सोलर पॉवर कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कारला शहरी भागातील दैनंदिन वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.
वायवे मोबिलिटीचे प्रोग्राम मॅनेजर अंकित जैन यांनी या कारसंदर्भात माहिती देताना सांगितले की, हे एक प्रोटोटाईप मॉडेल आहे. या कारमध्ये दोन वयस्क व्यक्ती आणि एक लहान मुलं बसण्याची व्यवस्था आहे. आकर्षक लुक असलेल्या या लहान Solar powered electric car इलेक्ट्रिक कारला दोन दरवाजे आहेत. महिंद्राद्वारा सादर करण्यात आलेल्या ई-20 ची आठवण ही नवीन कार पाहिल्यानंतर होते.
ठळक वैशिष्ट्ये
- कारच्या फ्रंटला इंडिपेंडंट कोल स्प्रिंग सस्पेंशन, मागील बाजूला डुअर शॉक सस्पेंशन
- पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक, तर मागच्या भागातील चाकाला ड्रम ब्रेक्स
- कारचे टर्निंग रेडियस 3.9 मीटर आहे
- रियर व्हील ड्राईव्ह असलेल्या कारची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास
- कारमध्ये 14 केडब्ल्यूएचची क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे.
- कार एकदा चार्ज केल्यानंतर किमान 250 किमीचे अंतर कापू शकते
आणखी महत्त्वाचे...
Solar powered electric car ही कार पूर्णत: सोलर एनर्जीवर चालत नाही. मात्र, यात देण्यात आलेले सोलर पॅनल एक पर्याय म्हणून काम करते, जे कारला अतिरिक्त 10 किमीपर्यंत चालण्यासाठी मदत करते. या कारची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर तिचा जेव्हा वापर होतो, तेव्हा त्याची रनिंग कॉस्ट फक्त 80 पैसे प्रतिकिलोमीटर पडते. ही कार अवघ्या पाच सेकंदात 0 ते 40 किलीमीटर प्रतितासची गती पडण्यासाठीही सक्षम आहे.