नागपूर,
26 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधानाननी (geeta pathan) लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू झाल्याचे सांगितले.
पहा व्हिडिओ ...भरतनगरात सामूहिक गीता पठणाचा निनाद
त्यातून प्रेरणा घेऊन आपण देशासाठी (geeta pathan) काय करू शकतो ह्या विचारातून 'गीताज्ञान मंडळ धरमपेठ' यांनी एक संकल्प केला. आपल्या भारतीय सैनिकांसाठी त्याचप्रमाणे देशाच्या विकासात निरलसपणे योगदान देणाऱ्या स्वयंसेवी सामाजिक संस्था किंवा व्यक्ती या सर्व कर्मयोग्यांच्या पाठीशी श्री गोपालकृष्णाची कृपा असावी म्हणून ७५ मंदिरांमधे गीतापठणाचा संकल्प केला. आज भरतनगर दत्त मंदिरात ५५ वे गीतापठण झाले. भरत नगर नागरिक मंडळ व मंदिर समितीच्या सहकार्यानचे हे शक्य झाले. शेवटचे ७५ वे गीतापठण वृंदावनला निखिल निखिल बांकेबिहारी समोर करावे असा मानस आहे. प्रत्येक गीतापठणाला 35 ते 40 महिलांची उपस्थिती असते. आज 36 महिलांची उपस्थिती होती.
(- सौजन्य : संपर्क मित्र लीलाधर आढाऊ)