साप्ताहिक राशिभविष्य, 15 ते 21 जानेवारी 2023

    दिनांक :15-Jan-2023
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 

sapta 
 
मेष (Aries) : सुरुवातीस खर्च, नंतर लाभ
Weekly-Horoscope : हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा जाण्याची शक्यता आहे. थोड्या खर्चीक घटनांनी सुरुवात होणार असली तरी आठवड्याच्या मध्यात काही आर्थिक लाभ होऊन स्थिती सुधारेल. महत्त्वाची कामे वेग धरतील. सुख व शांतीचे वातावरण निर्माण होईल. मित्रांचा पाठिंबा राहील. काहींना मात्र वारशाच्या मुद्यावरून भावंडांत वितुष्ट निर्माण होण्याचे अनुभव मिळू शकतात. व्यवसाय, नोकरीत वातावरण काहीसे बिघडलेलेच राहील. 17 तारखेला महाग्रह शनिचेे राश्यंतर होणार असून, तो आपणास सामान्यतः धनलाभकारक ठरणार आहे.
शुभ दिनांक- 18, 19, 20, 21.
 
 
वृषभ (Taurus) : इच्छित कामे पूर्ण होतील
या आठवड्यात आपल्या आर्थिक आवक-जावकचा ताळमेळ प्रयत्नपूर्वक जमवावा लागणार आहे. दैनंदिन खर्चाला अनेक वाटा फुटलेल्या असतील. शिवाय आर्थिक फसवणूक, अचानक मोठे खर्च, कुटुंबात एखाद्याचे हॉस्पिटलायझेशन करावे लागण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यानंतर मात्र काहीसा दिलासा निश्चित मिळेल. नातेसंबंधात नवी ऊर्जा भरली जाईल. आरोग्य सुधारेल. इच्छित कामे पूर्ण होतील. 17 तारखेला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, तो आपणास काहीसा उपद्रवकारी ठरणार आहे.
शुभ दिनांक- 15, 16, 19, 21.
 
मिथुन (Gemini) : संमिश्र योगांचा अनुभव यावा
Weekly-Horoscope : हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सरकारी कामे, तसेच कोर्टाच्या कामात मोठे यश मिळू शकेल. मधल्या काळात पैशाला अनेक पाय फुटून खर्च वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र शेवटी-शेवटी आर्थिक स्थैर्य लाभेल. व्यावसायिक कामात ज्येष्ठांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. 17 तारखेला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, तो आपणास काहीसा खर्च वृद्धीकारक ठरणार आहे.
शुभ दिनांक- 16, 17, 18, 20.
 
 
कर्क (Cancer) : कार्यक्षेत्री दबदबा निर्माण व्हावा
या आठवड्यातील ग्रहस्थिती आपल्याला सुरुवातीला अधिकच उत्साहवर्धक ठरावी. नोकरी, व्यवसायातील रेंगाळलेल्या कामांना गती देता येईल. कार्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण होण्यास मदत होईल. कुटुंबातील, समाजातील दर्जा उंचावेल. शेवटी शेवटी मात्र काहींना शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य निर्माण होण्याचे भय राहील. सावधगिरी म्हणून धावपळ टाळायला हवी. आपली नियमित औषधे-पथ्ये सांभाळावीत. 17 ला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, तो आपणास काहीसा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक- 16, 17, 19, 21.
 
 
सिंह (Leo) : भावनेच्या भरात चुका संभव
Weekly-Horoscope : या आठवड्यात लाभलेले ग्रहमान पाहता विरोधकांचा उपद्रव, कमालीची स्पर्धा, हाताखालच्या सहकार्‍यांपासून मनस्ताप असे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. भावनेच्या भरात काही निर्णय चुकण्याची शक्यता राहील. त्यामुळे सावध असावे. मध्यात काहींना प्रवास, भ्रमंती, तीर्थाटन यासाठी उपयुक्त स्थिती राहील. कलावंत व साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व्हावा. संततीच्या उन्नतीचे योग यावेत. 17 तारखेला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, तो आपणास काहीसा चिंतावृद्धी करणारा ठरू शकतो.
शुभ दिनांक- 18, 19, 20, 21.
 
 
कन्या (Virgo) : मनाचे संतुलन ढळू नये
या आठवड्यात आपले काही आर्थिक व्यवहार वादाच्या भोवर्‍यात व संशयाच्या जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे. विशेषतः महिला सहकार्‍यांबाबत, मैत्रिणींसोबत अत्यंत सावधगिरीचे धोरण बाळगावयास हवे. महिलांनी पुरुष सहकार्‍यांपासून जरा सावधच राहावयास हवे. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत. आरोग्याची काळजी घ्या. स्वास्थ्य नरम-गरम राहू शकते. या सार्‍यात मनाचे संतुलन कायम राखण्याचा प्रयत्न करा. येत्या 17 तारखेला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, सर्वसाधारणपणे तो आपणास अर्थलाभ करून देणारा ठरू शकतो.
शुभ दिनांक- 15,18,20,21.
 
 
तुला (Libra) : कुटुंबात गैरसमज टाळावेत
Weekly-Horoscope : प्राप्त ग्रहस्थिती पाहता या आठवड्याची सुरुवात फारच उत्तम राहणार असली तरी मध्यात मात्र त्रासदायक अनुभव येऊ शकतात. संततीकडून काही धक्कादायक बातम्या कळू शकतात. जोडीदाराशी मतभेद, कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्याची चिंता निर्माण होणे असले अनुभव येऊ शकतात. आपली आर्थिक कोंडी होऊ शकते. कोर्टाच्या कामात वेळ, पैसा वाया जात असलेले जाणवेल. 17 तारखेला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, तो आपणास आरोग्याची काळजी घेण्यास सुचवीत आहे.
शुभ दिनांक- 15, 16, 17, 20.
 
 
वृश्चिक (Scorpio) : मोठी झेप घेऊ शकाल
या आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातून, मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नोकरी-व्यवसायात आपण एखादी मोठी झेप घेऊ शकाल, यात शंका नाही. आठवड्याच्या शेवटी मात्र स्थिती काहीशी बदलेल. काहींना नोकरीच्या कामामुळे बाहेर जावे लागेल. व्यवसायात स्पर्धा वाढून दगदग-धावपळ करावी लागू शकते. या काळात आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपसातील आर्थिक व्यवहार सुस्पष्ट असावेत. 17 तारखेला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, तो आपणास विरोधकांचा उपद्रव वाढविणारा ठरू शकतो.
शुभ दिनांक- 15, 17, 18, 20.
 
 
धनु (Sagittarius) : शनिची साडेसाती संपणार
Weekly-Horoscope : हा आठवडा आपणास अतिशय सुखदायक ठरावा. मात्र तरीही आपली कामे रेंगाळत आहेत. आळस, अनिच्छा काही काम करू देत नाही, आरोग्याच्या काही छुप्या कारणांनी देखील आपण काहीसे त्रस्त असू शकता. आपली गाडी पुढे सरकत नाही, अशी स्थिती आहे. मात्र या स्थितीवर प्रयत्नपूर्वक मात करावी लागेल. आळस झटकून कामाला लागा. येत्या 17 तारखेला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, तो आपणास साडेसातीतून मुक्त करणार असून, मोठे आर्थिक बळ देणारा ठरू शकेल.
शुभ दिनांक- 15, 17, 19, 20.
 
 
मकर (Capricorn) : साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू
विशेषतः सरकारी नोकरीत असणार्‍यांना हा आठवडा चांगला जावा. त्याचप्रमाणे स्वतःच्या तसेच भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना उत्तम लाभ मिळेल. अनपेक्षित बढती, व्यवसायात वाढ, आर्थिक आवक वाढण्याचे योग आहेत. बेरोजगारांचे नोकरी-व्यवसायाबाबतचे प्रश्न सुटू शकतील. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. येत्या 17 ला महाग्रह शनिचे राश्यंतर होणार असून, आपणास साडेसातीचा शेवटचा अडीच वर्षांचा टप्पा सुरू होईल. शनि आपणास काहीसा खर्चवृद्धी करणारा ठरू शकतो.
शुभ दिनांक- 16, 18, 20, 21.
 
 
कुंभ (Aquarius) : संततीकडून शुभवार्ता कळतील
Weekly-Horoscope : या आठवड्यात आपल्याला संततीकडून काही शुभवार्ता कळू शकतात किंवा मुलांच्या संदर्भात काही शुभ घटनाक्रम घडू शकतो. नोकरी, व्यवसाय, विवाह या अनुषंगाने काही हालचाली अवश्य घडतील. आठवडाअखेर आपल्याला आरोग्याच्या काही कुरबुरी निर्माण होेऊ शकतात. तसेच कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. 17 तारखेला महाग्रह शनि राश्यंतरानंतर आपल्या कुंभ राशीत येणार असून, आपणास साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. शनि आपणास मानसिक चिंता वाढविणारा ठरू शकतो.
शुभ दिनांक- 15, 16, 17, 20.
 
मीन (Pisces) : शनिची साडेसाती सुरू होणार
Weekly-Horoscope : नोकरी करणार्‍यांना हा आठवडा उत्तम ठरू शकतो. मात्र जबाबदारी वाढवून तो दगदग, चिंतादेखील वाढवू शकतो. काहींना अडलेले पैसे काढण्यासाठी आठवडा-मध्यात हालचाल केल्यास लाभ होईल. आठवडाअखेर कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल. जोडीदाराशी एकमत झाल्याने काही कौटुंबिक कामे तडीस नेता येतील. कुटुंबात मंगलकार्य ठरावे. हवामानातील बदल त्रासदायक ठरू शकतो. दरम्यान, येत्या 17 तारखेला महाग्रह शनिच्या राश्यंतरानंतर आपणास साडेसाती सुरू होणार आहे. त्यासोबतच काही अनर्थकारी घटना घडण्याचा संभव आहे.
शुभ दिनांक- 15, 16, 18, 20.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746