नेपाळमधील यति एअरलाईन्सचे विमान कोसळले

    दिनांक :15-Jan-2023
Total Views |
काठमांडू,
नेपाळमधील पोखरा येथे उड्डाण plane crashes करणारे यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरामध्ये कोसळले. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी पोस्टला सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान क्रॅश झालेल्या ATR-72 विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.

HJHG
 
 
सध्या विमानतळ बंद करण्यात आले आहे. अधिक तपशीलांच्या प्रतीक्षेत. काठमांडूहून पोखराला जाणारे यती एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची माहिती नेपाळी माध्यमांकडून मिळाली आहे. विमानात 68 प्रवासी होते. काठमांडू पोस्टने यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू सदस्य असलेले यति एअरलाइन्सचे विमान जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळले.
2019 पासून, यति एअरलाइन्स नेपाळ आणि दक्षिण आशियातील पहिली कार्बन न्यूट्रल एअरलाइन आहे. ही तारा एअरची मूळ कंपनी आहे. फोर्ब्सने 2019 मध्ये तारा एअरला 'सर्वात असुरक्षित एअरलाइन्स' म्हणून स्थान दिले.